HW News Marathi
राजकारण

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती पदाची घेतली शपथ

नवी दिल्ली | देशाच्या 15 व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  (Draupadi Murmu ) यांनी शपथ घेतली आहे. द्रौपदी मुर्मू यांना आज (25 जुलै) सकाळी  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा द्रौपदी मुर्मू यांना गोपनीयतेची शपथ दिली आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या महिला राष्ट्रपती विराजमान होणाऱ्या महिला ठरल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “स्वतंत्र भारतात जन्म झालेली मी पहिली राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नागरिकांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केला आहेत. या सर्वची पूर्तता करण्यासाठी गतीने काम करावे लागणार आहेत.  ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या मार्गावर वाटचाल करावी लागणार आहे. एका गरिब घरातील जन्मलेली मुलगी आज देशाच्या सर्वच्च पदावर पोहोचू शकते. राष्ट्रपती होणे हे माझे वैयक्तिक यश नाही. तर भारतातील प्रत्येक गरिब व्यक्तीचे यश असल्याचे असून भारतात गरीब पाहू शकतो आणि पूर्ण ही करू शकतो.”

 

द्रौपदी मुर्मू यांचा अल्प परिचय

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील असून द्रौपदी मुर्मू 1997 मध्ये रायनगरपूर नगर पंचायतमध्ये 1997 साली नगरसेवक झाल्या होत्या. 2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आल्या. भाजप सरकारमध्ये द्रौपदी मुर्मू यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळाला होता. 2015 मध्ये द्रौपदी मुर्मू यांना झारखंडच्या पहिल्या राज्यपाल झाल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारणातील पवारांविषयीची भीती संपली !

News Desk

पॉलिटिशन्स पोल, कोण बनविणार सरकार ?

News Desk

राफेलवर झालेल्या स्वार्थी राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान, पंतप्रधान मोदींची टीका

News Desk