मुंबई | दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez ) अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) यांच्याशी 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसला आज (26 सप्टेंबर) न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणी ईडीने जॅकलीनविरोधात आरोपपत्र सादर केल्यानंतर न्यायालयासमोर तिला हजर केले होते.
ईडीने सुकेश चंद्रशेखरवर ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी ईडीने जॅकलीनला आरोपपत्र दाखल घेत न्यायालयाने जॅकलीनला आज न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. या प्रकरणात सुकेशकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप जॅकलीनवर आहे. जॅकलीनला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी सुकेशने पैशांचा वापर केल्याचा आरोप ईडीने कला असून या प्रकरणात सुकेश हा सध्या तिहार तुरुंगात आहे.
#UPDATE | Actor Jacqueline Fernandez's lawyers move bail plea in money laundering case
— ANI (@ANI) September 26, 2022
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुकेश चंद्रशेखरला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. यानंतर सुकेशला अटक होईपर्यंत तो जॅकलीनच्या संपर्कात होता, असे ईडीच्या तपासात अढळून आले. या प्रकरणात ईडीने सुकेश, त्यांची पत्नी लीना मारिया पॉल आणि पिंकी इराणी यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात दोन वेळा दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केली आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.