HW News Marathi
मनोरंजन

“महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा” संभाजीराजेंचा निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा

मुंबई |  “महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा”, असा धमकीवजा इशारा  संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी केला आहे. यावेळी ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटात उल्लेख करत मराठी निर्माते, दिग्दर्शकांनावर संभाजीराजे छत्रपती यांनी हल्लाबोल केला आहे.

संभाजी राजे म्हणाले, “मी सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छितो की, जर असे चित्रपटांची निर्मिती केली तर गाठ माझ्याशी आहे. मी तुम्हाला आडवा आला नाही आलो तर बघाच. मी या घराण्यात जन्म होऊन काय फायदा आहे. वेळ प्रसंगी मला काही नसले तरी ही चालेल. पण, महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा, असा धमकीवजा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

शिवाजी महाराजांची पुस्तक वाचत नाही

संभाजी राजे पुढे म्हणाले, “सिनेमॅटिक लिबर्टीच्या आहे म्हणून काही करायचे. भालजी पेंढाकरांचा आदर्श घ्या. यात आपल्या लोकांशी सुद्धा चूक आहे. आपण पुस्तक वाचत नाही. शिवाजी महाराजांची पुस्तक वाचत नाही. वासी बेंद्र असतील. जयसिंगराव पवार असतील. आयुष्यभर या लोकांनी इतिहास लिहिताना आयुष्य घालवली. आणि लोकांना ट्रामेस्टिशन आवडते म्हणून आपण काही करायचे. माझी सरकारला विनंती आहे. राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल. माझी विनंती आणि सूचना सुद्धा आहेत. तुम्हाला असे ऐतिहासिक चित्रपट काढायचे असतील.”

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोझॅकच्या माध्यमातून चिमुकल्यांना अनोखी भेट

News Desk

जयललिता यांचा ‘द आयर्न लेडी’ बायोपिक सिनेमा लवकरच

Gauri Tilekar

इरफानच्या बांगलादेशी सिनेमाची ऑस्करसाठी निवड

Gauri Tilekar