HW News Marathi
मनोरंजन

“चलो जीते है” मोदींवर आधारित लघुपट शाळांमध्ये दाखवा!

मुंबई | “चलो जीते है” हा लघुपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आहे. हा लघुपट राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्हाप्रमुख आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षकांना यासंबंधीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आमच्याकडून अशा सूचना दिल्या नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हा लघुपट १८ सप्टेंबरला elearning.parthinfotech.in या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या संकेतस्तळावर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळांमध्ये हा लघुपट दाखवण्याच्या सूचना देण्यात आला आहे. यासाठी एक एमबीपीएस इंटरनेट स्पीड हवा, सर्व शाळांनी या लघुपटासाठी प्रक्षेपणासाटी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटरची सोय करायला शाळांना सांगितले आहे.

चलो जीते हैं लघुपट

चलो जीते है या लघुपट ३२ मिनिटांचा असून मंगेश हडवळे यांनी दिग्दर्शित केला आहे. हा लघुपट जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानेही पाहिला आहे. यानंतर विद्यार्थ्यांना हा लघुपट दाखविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…हे नवीन गाणे ट्रेंड स्थापित करण्यास सज्ज

News Desk

रजनीकांत यांच्या ‘पेटा’ सिनेमाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा

News Desk

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील `हे मृत्युंजय’ नाटकाचा मुहूर्त

News Desk