HW News Marathi
मनोरंजन

‘चुंबक’ ठरला उत्कृष्ट मराठी सिनेमा

पुणे | पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘चुंबक’ या सिनेमाला संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. संदीप मोदी दिग्दर्शित ‘चुंबक’ सिनेमाला हा सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच सौरभ भावे, संदीप मोरे यांना चुंबक सिनेमाच्या कथेसाठी उत्कृष्ट पटकथा पुरस्कार तर स्वानंद किरकिरे यांना चुंबक या सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

धनंजय कुलकर्णी यांना दिथी उत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कार, देविका दफ्तरदार यांना नाळ सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सुमित्रा भावे यांना दिथी सिनेमासाठी गौरविण्यात आले. प्रेक्षक पसंतीचा चित्रपट हा पुरस्कार सुमित्रा भावे दिग्दर्शित दिठी या चित्रपटाला. तर जागतिक स्पर्धा विभागात उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार गर्ल्स ऑफ द सन या चित्रपटाला मिळाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी आयपीएलमध्ये सट्टा लावला | अरबाज खान

News Desk

मोडी लिपीतून दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या पणत्या

swarit

बीग बी अमिताभ गोत्यात!

News Desk