HW News Marathi
मनोरंजन

विरानुष्का नंतर या सेलिब्रेटी जोडप्याची आहे चर्चा; खान कन्येचं कुणावर आलं दिल ?

मुंबई | बॉलिवूड ही एक फॅक्टरी आहे. यात चित्रपटही बनवले जातात, गॉसिपही, गरमागरम चर्चासुद्धा या फॅक्टरीतलेच प्रचंड लोकप्रिय प्रॉडक्ट म्हणता येतील. नव्वदीच्या दशकात बॉलिवूडला स्टारडमचा बेताज बादशाह या इंडस्ट्रीला मिळाला. त्याचं नाव शाहरूख खान. तरुणाईला दिवाना करून रईस झालेला हा बॉलिवूडचा डॉन आजही जगभर नावाजलेला, सुपरस्टार आहे. मात्र आज आपण बोलणार आहोत ते शाहरूखची मुलगी ‘सुहाना’ खानबद्दल. याचे कारण म्हणजे मागच्याच महिन्यात सुहाना १८ वर्षाची झाली. अन ती प्रेमातही पडली आहे बरं का ? स्टारकिडच्या प्रेमाची चर्चा सध्याच्या पिढीत न झाली तरच नवल !

सुहाना खानचं हृदय ज्या तरुणाने चोरलंय तो दुसरा तिसरा कुणी नसून शुभनन गिल आहे. शुभनन सध्या कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल संघात खेळतो. तरुणींमध्ये हा चेहरा ट्रेंडिंगमध्ये आहे.मात्र ज्याच्यावर तरूणी घायाळ आहेत तो मात्र आपल्या टीमच्या मालकांच्या मुलीसोबत पॅव्हेलियनमध्ये गुलगुलु गप्पा मारताना दिसतो. तसे सुहानापण काही कमी लोकप्रिय नाही बरं का ? इन्स्टाग्राम, फेसबुकवर, ट्वीटरवर तिचे लाखोंच्या संख्येत फॅन फॉलोवर्स आहेत. आई गौरी खानसोबत ती पार्ट्यांमध्ये भाव खाऊन जाते. तर मित्रांच्यासोबत ताजमहाल बघायला गेली तरी तिच्या चाहत्यांमध्ये लाखोंच्या संख्येने वाढ होत गेली आहे.

शुभनन हा १९ वर्षीय खालील संघातून खेळतो. भारताला विश्वचषक मिळवून देणाऱ्या संघातील तो मुख्य फास्ट बॉलर आहे. आयपीएलमध्ये त्याला यंदाच्या वर्षी संधी मिळण्यात यंदाच्या वर्षी विश्वचषकात मिळवलेले यशच कामी आले होते. तर सुहानाला क्रिकेट बघण्याची खूप हौस! इतकंच काय पप्पा शाहरूखसोबत मैदानाला फेरी मारण्यातही सुहाना अग्रेसर. तेव्हा दिल जो मिलने थे वो तो वो मिल ही गये.

  • सुहानाच्या अभिनयाचे काय ?

सुहानाच्या अभिनयाबद्दल शाहरुख म्हणतो, “जर सुहानामध्ये माझ्यापेक्षा ५ टक्के जास्त अभिनयाची इच्छाशक्ती आणि जिद्द असेल,भविष्यात ती आता करते त्याच्याहून १० टक्के जास्त मेहनत घ्यायची तयारी असेल तर ती नक्कीच मोठी अभिनेत्री बनू शकते”. चला, बॉलिवूडच्या सगळ्यात मोठ्या स्टारने हे सांगितलं म्हटल्यावर त्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नसावी. शाहरूखने अभिनेत्री बनण्यासाठीच्या दिव्यत्वाचा आदर करत म्हटलं की, “माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की सुहानाने त्या सगळ्या कठीण चाचण्यांतून जावे ज्यातून सध्याच्या अभिनेत्रींनी खडतर असा प्रवास केला आहे. यावरून आपण नक्कीच म्हणू शकतो की सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करेल. सुहानाला अभिनयाची खूप आवड आहे. ती सध्या नाटकांमधून काम करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगमन बाप्पाचे | ढोल ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा

News Desk

पारंपारीक पोर्तुगीज कलकल

News Desk

चार्ली चॅप्लिनचा नेहरूंसोबत घडलेला हा किस्सा तुम्हाला माहीत आहे का ?

News Desk