HW News Marathi
मनोरंजन

‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाची स्थगिती

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात उद्या (१० एप्रिल) प्रदर्शन होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट विवादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे या चित्रपटावर स्थगिती आणली आहे.

https://www.instagram.com/p/BwBu0S9hmOx/?utm_source=ig_web_copy_link

या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांची व्यक्तिरेखा अभिनेते मनोज जोशी साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडीत यांनी केली आहे. आनंद पंडीत केवळ निर्माते म्हणूनच नाही तर वितरक म्हणूनही भूमिका बजावत आहेत. परंतु पीएम नरेंद्र मोदी जीवनावर आधारित चित्रपट केवळ भारतातच नाही, तर इतर देशांतही प्रदर्शित होणार होता. ओमांग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ओमांग कुमार यांनी यापूर्वी मेरी कोम, सरबजीत,भूमी यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या रिलीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर आचारसंहिता भंग होईल का, याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले होते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 नाना पाटेकर शहिदांच्या कुटुंबियांना मदत करणार

News Desk

विजय चव्हाण यांच्या निधनाने महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला | तावडे

News Desk

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड…

Manasi Devkar