HW News Marathi
मनोरंजन

विख्यात मराठी कवी ग.दि. माडगूळकर

मुंबई | विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी जन्म शेटेफळ ह्या गावी झाला. माडगूळकर यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले . ते गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात त्यांनी पदार्पण केले. लहानपणापासून त्यांना लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा त्यांना पुढे उपयोग झाला.

‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली. खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले.

तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी नसरुद्दीन शहांच्या नावाचा विचार ?

Gauri Tilekar

श्रींचा बाप्पा यंदा भगव्या महालात

News Desk

Gandhi Jayanti : राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाहून विनोद तावडेंचा ‘आवाज’ चढला

swarit