HW News Marathi
मनोरंजन

पहिल्यांदाच ‘आरॉन’मध्ये शशांक केतकर आणि नेहा जोशी एकत्र

हौसेखातर अभिनय करत असताना त्याचे व्यवसायात रूपांतर कधी झाले हे त्याला कळलेच नाही. ऑस्ट्रेलियात अभियंत्याचे उच्च शिक्षण घेत असताना तोहौसेखातर सांस्कृतिक कार्यक्रमांतून अभिनय करायचा. पुढे भारतात परतल्यावर पुण्यात त्याने अभिनयक्षेत्रातच काम करायचे ठरवले. नाटक, मालिकाकेल्या परंतु ‘होणार सून मी त्या घरची’ ने त्याचे आयुष्यच पालटून टाकले. हो. शशांक केतकर म्हणता म्हणता महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातीलताईत बनला. वन वे तिकीट व ३१ दिवस सारख्या चित्रपटांमधून दिसलेला शशांक केतकर आता आगामी मराठी चित्रपट ‘आरॉन’ मधून एकदम वेगळ्याभूमिकेत दिसणार आहे.

पुण्यात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजविणारी नेहा जोशी हिला ‘क्षण एक पुरे’ या व्यावसायिक नाटकाने मनोरंजनसृष्टीत आणले. २००० साली तिला‘ऊन पाऊस’ ही मालिका मिळाली व ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. मालिका, नाटकं, चित्रपट यातून चतुरस्त्र भूमिका करत तिने आपले स्वतःचेवेगळे स्थान निर्माण केले. झेंडा, सुंदर माझे घर, पोश्टर बॉईझ, पोश्टर गर्ल, लालबागची राणी हे तिचे काही चित्रपट. अलीकडेच ती ‘वाडा चिरेबंदी’ यानाट्यत्रयीत व ‘फर्जंद’ या चित्रपटातून दिसली. आता ती आगामी मराठी चित्रपट ‘आरॉन’ मधून एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

शशांक केतकर व नेहा जोशी हे दोघे पुणेकर आता पॅरिस मध्ये चित्रित झालेल्या ‘आरॉन’ चित्रपटामध्ये प्रथमच एकत्र येत आहेत. दोघांनीही अप्रतिम भूमिकानिभावल्या असून एक आगळी वेगळी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जिएनपी फिल्म्स’ ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गिरीशनारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. शशांक केतकर आणि नेहा जोशी ही अनोखी जोडी असलेला ‘आरॉन’ हा चित्रपट ७ डिसेंबर २०१८ ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कपिल शर्मा आणि चाहते

swarit

प्रेक्षकांच्या अपेक्षांचं रिंगण पूर्ण होईल

News Desk

महाराष्ट्राची महती सांगणारे “माझा महाराष्ट्र” गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

News Desk
महाराष्ट्र

अपहरण केलेल्या 12 वर्षीय मुलीची पुणे पोलिसांनी केली सुखरूप सुटका

News Desk

पुणे | पुण्याच्या चिंचवड भागात राहणाऱ्या माही अवध जैन नामक मुलीचे अपहरण झाल्याचे काळताच पुणे पोलिसांनी 12 तासात त्या मुलीचा शोध घेत तिला आपल्या पालकांकडे सुपूर्द केले.

मागील तीन वर्षांपासून माही चिंचवड मधील क्विन्स टाऊन सोसायटीमध्ये राहते. नेहमीप्रमाणे दुपारी चार वाजता ती शाळेतुन घरी आली. नंतर सोसायटी जवळ असलेल्या मायमार्ट मध्ये पेन आणण्यासाठी ती गेली. तिथेच कार मध्ये बसलेल्या दोन जणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. तेव्हा माहिने आरडाओरडा केला. तीचा आवाज एकूण दुकानदार बाहेर आला मात्र ते दोघे महिला घेऊन पसार झाले होते.

दुकानदारने आपल्या दुचाकीने त्यांच्या कारचा पाठलाग केला परंतु तो त्याच्या गाडीला गाठू शकला नाही. तेव्हा दुकानदाराने याबाबत माहिच्या घरी कळवले. माहिच्या पालकांनी त्वरित पोलिसांकडे धाव घेत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी लगेच अपहरणकर्त्यांचा शोध सुरु केला. रात्री 8 वाजता माहिच्या वडिलांना फोन आला ज्यावरून पैश्यांची मागणी करण्यात आली. त्या फोनचे लोकेशन ट्रॅक करत पोलिसांनी शनिवारी सकाळी 4 वाजता दोन जणांना मारुंजी परिसरातून अटक केली. आणि माहीला तिच्या पालकांकडे सुरक्षित सोपवले. माहिच्या वडील आयटी क्षेत्रात तर आई बॅंकेत काम करतात.

Related posts

गोंदिया, भंडारा घटनेतील सर्व आरोपींवर कडक कारवाई करणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख उद्याच जाहीर होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

‘तरीही त्यांची जन आशिर्वाद यात्रा होणारच!’ चंद्रकांत पाटील यांची घोषणा

News Desk