नवी दिल्ली : ‘सरकारने आमचा अपमान केला असून आम्ही सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेते या सोहळ्यावर बिहिष्कार टाकणार आहोत,’ अशा शब्दात अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘राष्ट्रपतींऐवजी दुसरे कोणी जर पुरस्कार देणार असतील तर ते आमचे कष्ट, आमच्या भाषेचा अपमान आहे”, असे सांगत प्रसाद ओक यांनी नाराजीचा सूर आळवला आहे.
After reports emerged that President Kovind will be giving away only 11 awards. National Award winning Marathi film director Prakash Oak says, ' We feel insulted, 75 awardees are threatening to boycott the award ceremony today.' pic.twitter.com/GJTOwcAqVr
— ANI (@ANI) May 3, 2018
राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात ६५ राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करणे ही एक परंपरा आहे. पण, यंदा केवळ ११ जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रसाद ओक यांनी दिग्दर्शक केलेला ‘कच्चा लिंबू’ या सिनेमेला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.