HW News Marathi
मनोरंजन

Kumbh Mela 2019 : आज पहिले शाहीस्नान

प्रयागराज | उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा २०१९ ची सुरुवात झाली आहे. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमस्थळी आज (१५ जानेवारी) सकाळी पाच वाजल्यापासून शाहीस्नान सुरू झाले आहे. नागा साधू आणि नंतर इतर आखाड्यांच्या साधू-संतांच्या शाहीस्नान करणार असून यानंतर भाविकांनीही शाहीस्नान केले आहे. यानंतर भाविकांनी देखील शाहीस्नानांचा आनंद घेतला.

सकाळी सर्वात आधी महानिर्वाणीचे साधू-संत संपूर्ण लवाजम्यासह शाहीस्नानासाठी संगमावर पोहोचले. यानंतर आखाड्यांच्या स्नानाच्या क्रमाची सुरुवात झाली. सर्व आखाड्यांना स्नानासाठी ३० ते ४५ मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. साधु संतांसह सामान्य भाविकही संगमाच्या विविध तटावर मध्यरात्रीपासून स्नान करत आहेत. कडेकोट सुरक्षेत तटावर स्नान आणि पूजापाठ सुरुच आहे. प्रयागराज येथील पारा सध्या १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असूनही मोठ्या प्रमाणात भाविक डुबकी मारत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयनॉक्स थिएटरमध्ये ‘ठाकरे’च्या पोस्टरवरून शिवसैनिकांचा राडा

News Desk

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

Aprna

ठाकरे सिनेमाचा स्पेशल स्क्रिनिंगलाच निर्माते व दिग्दर्शकांमध्ये रंगले मानआपमान नाट्य

News Desk