HW News Marathi
मनोरंजन

शब्दांचे जादूगार गुलजार…

धनंजय दळवी | शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस. लोकप्रिय गुलजार यांचे खरे नाव संपूर्ण सिंह कालरा असे आहे. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३४ मध्ये झेलम जिल्ह्यातील दीना गावात झाला. जे आता पाकिस्तानात आहे. ते सिने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होते. खूप कमी वयातच गुलजार हे कविता करायला लागले होते. मात्र त्यांच्या वडीलांना हे पसंत नव्हते. तरीही त्यांनी कविता करणे सोडले नाही आणि आज त्याच कवितांमुळे गुलजार बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे.

सहा वर्षाचे असताना गुलजार यांनी आपली जन्मभूमी सोडली आणि वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांना आपल्या मायदेशी परतण्याची संधी मिळाली. एवढ्या वर्षात गुलजार यांनी अनेक लेखन केले. आणि त्यांच्या त्या प्रत्येक लेखनातील अनोखी नजाकत वाचकांनी उचलून धरली. गुलजार यांनी आतापर्यंत २० वेळा फिल्मफेअर आणि पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१० मध्ये त्यांनी ‘स्मलडॉग मिलेनिअर’ सिनेमासाठी लिहिलेल्या ‘जय हो’ गाण्याला ग्रमी पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर त्यांना २०१३ मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

ऐ उम्र, अगर दम है तो कर दे इतनी सी ख़ता..,

बचपन तो छीन लिया, बचपना छीन कर बता…

भावनांची ही अशी मांडणी आणि शब्दांची जादुगरी केवळ गुलजारच करु शकतात यात कुणाचही दुमत नसावे. लाखोंच्या जखमांवर मलमाचे काम करणारे शब्द गुंफणाऱ्या या शब्दांच्या जादुगाराचा आज वाढदिवस. गुलजार यांचे वय कितीही वाढले आणि आजची पिढी कितीही मॉडर्न झाली तरी त्यांच्या शब्दांवर प्रेम करणारे कमी होत नाहीत. आजच्या तरुणाईच्या मनाचा विचार करुन ते आजही त्यांच्या गाण्यात मॉडर्न विश्व दाखवत आहेत. ही त्यांच्या गाण्यांची खासितय आहे. जितकी त्यांची जुनी गाणी लोकप्रिय आहेत तितकीच त्यांची नवीन गाणी तरुणाईने डोक्यावर घेतली.

गुलजार यांच्या बद्दल अजून काही गोष्टी –

१) गुलजार हे नेहमी पांढरे कपडे का घालतात असा प्रश्न विचारला जातो. याचे उत्तर त्यांनी एका मुलाखतीत दिले होते. त्यांनी सांगितले होते की, पूर्वी त्यांच्याकडे पांढऱ्या कपड्यांचे दोन जोड होते. दररोज ते एक धुवायला टाकायचे आणि एक वापरायचे. कॉलेजपासूनही ते हेच कपडे वापरायचे. तेव्हापासून त्यांना हेच पांढरे कपडे वापरण्याची आवड आहे.

२) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले गुलजार साहेब हे जेव्हा खालसा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा ते पार्ट टाइम जॉब म्हणून एका गॅरेजवर काम करायचे. इथे ते गाड्यांना रंग देण्याचं काम करत असते. तर रिकाम्या वेळात ते कविता लिहित असते.

३) गुलजार यांनी बिमल रॉय यांच्यासोबत असिस्टंट म्हणून काम केलं. एस.डी.बर्मन यांच्या ‘बंदिनी’ पासून त्यांनी गीतकार म्हणून काम सुरु केलं. त्यांचं पहिलं गाणं ‘मोरा गोरा अंग…’ हे आहे.

४) दिग्दर्शक म्हणून गुलजार यांचा पहिला सिनेमा ‘मेरे अपने’ हा होता. हा सिनेमा १९७१ मध्ये आला होता. हा सिनेमा एका बंगाली सिनेमाचा रिमेक होता.

५) गुलजार यांच्या बहुतेक सिनेमांमध्ये फ्लॅशबॅक बघायला मिळतो. त्यांचे म्हणने आहे की, भूतकाळ दाखवल्याशिवाय सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही. याची झलक ‘किताब’, ‘आंधी’ आणि ‘इजाजत’ या सिनेमात बघायला मिळाली.

६) गुलजार हे १९७३ मध्ये आलेल्या ‘कोशिश’ सिनेमासाठी साइन लॅंग्वेज शिकले होते. कारण हा सिनेमा मूक-बधीर विषयावर आधारित होता. यात संजीव कुमार आणि जया भादुरीने काम केलं होतं.

७) त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘हू तू तू’ फ्लॉप झाला तेव्हा गुलजार हे डिप्रेशनमध्ये गेले होते. यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी शायरी आणि कथांकडे जास्त लक्ष केंद्रीत केलं.

८) गुलजार यांना टेनिस खेळण्याची खूप आवड आहे. या वयातही ते रोज सकाळी टेनिस आवर्जून खेळतात.

९) १९७३ मध्ये गुलजार यांनी अभिनेत्री राखी यांच्याशी लग्न केले. पण त्यांची मुलगी मेघना दीड वर्षांची असतानाच दोघे वेगळे झाले. मात्र दोघांनी घटस्फोट घेतला नाही. मेघनाला दोघांचे प्रेम मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोपामुद्राने बनविला मातीचा गणपती!

News Desk

मराठीतून द्या नाताळच्या शुभेच्छा…

News Desk

#Metooला ए. आर. रहमान यांचा पाठिंबा

Gauri Tilekar