HW News Marathi
मनोरंजन

भारताने कोरले ‘या’ दोन ऑस्कर पुरस्कारांवर नाव

मुंबई | यंदाचा ऑस्कर 2023 (Oscar 2023) पुरस्कार सोहळ्यात एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ (RRR) चित्रपताटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) या गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. तर भारताच्या ‘द एलिफंट विस्परर्स’ (The Elephant Whisperers) या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पटकविला आहे. यामुळे यंदाच ९५ व्या ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा भारताला दोन पुरस्कार मिळाला आहे. या नाटू नाटू आणि  द एलिफंट विस्परर्स या ऑस्कर पुरस्कार मिळाल्यामुळे देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

यापूर्वी नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. यानतंर या गाण्याने ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर  संगीतकार एम एम कीरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.  ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली, संगीतकार एम एम कीरावानी, अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर हजेरी लावली.

आरआरआर हा चित्रपट 24 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटात अभिनेता राम चरण, अभिनेता ज्युनियर एनटीआर, अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता अजय देवगण हे प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘द एलिफंट विस्परर्स’ हा माहितीपट 41 मिनिटाचा आहे.

 

Related posts

प्रद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार   

News Desk

आयुष्यमान आणि भूमीची कंडोम राइड

News Desk

लोककला जिवंत ठेवण्यासाठी अनोखा उपक्रम

News Desk