बॉलीवूडची सुप्रिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या ड्रीम गर्ल नावे ओळखले जाते. हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ साली तामिळ घरात झाला. हेमा मालिनी या एक अभिनेत्री, दिगदर्शक, लेखक, भरतनाट्यम नर्तकी आहेत. तसेच त्या भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची सदस्य सुद्धा आहेत. हेमा मालिनी यांनी वयाच्या १६ व्या वर्षांपासून अभिनयाला सुरुवात केली. ईठू साथिया(१९६८) या चित्रपटातून त्यांनी तामिळ चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांनतर त्यांनी ‘सपणो का सौदागर’ या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारत हिंदी सिनेसृष्टी पदार्पण केले.
हेमा मालिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली असून त्यांनी अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका साकारल्या आहे. शोले या सिनेमातील हेमा मालिनी यांची बसंतीची भूमिका प्रक्षेकांच्या विशेष पसंदीत उतरली.
१९७०च्या दशकामध्ये हेमा मालिनी या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. १९८० साली हेमा मालिनीने सह-अभिनेता धर्मेंद्रसोबत विवाह केला. फेब्रुवारी २००४ मध्ये हेमा मालिनीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यानंतर २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभा सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यांनतर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी यांना उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या.
१९७२ सालच्या सीता और गीता चित्रपटामधील दुहेरी भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. २००० मध्ये हेमा मालिनी यांना फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड सन्मानित करण्यात आले. तसेच भारत सरकारच्या वतीने पद्मश्री आणि सर्वोच्च नागरिक हे सन्मान देऊन त्यांना गौरविण्यात आले.
हेमा मालिनी यांचे चाहते भारत नव्हे तर गभरात आहेत. परंतु हेमा मालिनी यांचे डाय हार्ट फॅन असणारे एक दिग्गज व्यक्ती होते. ती व्यक्ती म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते.हेमा मालिनी यांची वाजपेयींसोबतची एक आठवण म्हणजे ,”मी राजकारणात विशेषत: भाजपमध्ये येण्याचे श्रेय अभिनेते विनोद खन्ना यांना जाते. कारण १९९९मध्ये गुरुदासपुरमधून लोकसभेची निवडणूक लढवत होते आणि विनोद यांनी आपणास प्रचारासाठी बोलवले होते. प्रचारादरम्यानचे भाषण ऐकून लालकृष्ण अडवाणी यांनी बिहारमध्ये प्रचार करण्याचे आमंत्रण दिले होते. यानंतर भाजपच्या प्रचारासाठी मी जात होते आणि २००३ मध्ये त्यांनी राज्यसभा सदस्यत्व देऊन माझ्यावर जबाबदारी सोपवली होती”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.