HW Marathi
मनोरंजन राजकारण

कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे कधी लपविले नाही, तरी देखील नागरिकत्वावरून वाद का ?

मुंबई | लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्यात मुंबई आणि उपनगरात २९ एप्रिल रोजी मतदान झाले. यावेळी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु  अभिनेता आणि खिलाडी अक्षय कुमारला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यानंतर अक्षयच्या देशप्रेमा आणि नागरिकत्वाचा वाद सोशल मीडियावर चांगलाच रंगलेला पाहायला मिळाला होता.

यानंतर या वादावर पहिल्यादांच अक्षय कुमार यांनी याबाबत स्पष्टीकरण देऊन यांच्यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे.  यावर अक्षय कुमार यांनी ट्वीट करत याला उत्तर दिले आहे. या ट्वीटमध्ये अक्षयने म्हटले की, माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे कधीही मी लपवले नाही. मग यावर आताच  का वाद उभा केला जात आहे, असा उलट सवाल अक्षय कुमार यांनी उभा केला आहे.

अक्षय कुमार यांनी पुढे असे देखील म्हटले की, “माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, हे जितके खरे आहे हेही तितकेच खरे की, मी गेल्या सात वर्षापासून कॅनडाला गेलेलो नाही. मी भारतातील सर्व प्रकारचे कर भरत असून मी येथेच काम करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून माझ्या देशाविषयीचे प्रेम सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर कधीही आलेली नाही. पण गरज नसताना माझ्या नागरिकत्वाचा मुद्दा मध्ये ओढला जातोय हे पाहून दुःख होतेय. हा मुद्दा वैयक्तिक, कायदेशीर, अराजकीय आणि इतरांशी काहीही संबंध नसलेला आहे. माझा भारत आणखी मजबूत बनवण्यासाठी मी कायम योगदान देत राहिन एवढेच सांगतो,” असे स्पष्टीकरण अक्षय कुमारने दिले.

 

Related posts

उपेंद्र कुशवाहा यांचा एनडीएला रामराम तर यूपीएमध्ये प्रवेश

News Desk

पंतप्रधान मोदींनी आपला शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा !

News Desk

युतीसाठी भाजपकडून मनसेची मनधरणी ?

News Desk