HW Marathi
मनोरंजन

मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या निर्लज्जपणाचा तीव्र निषेध करतो !

मुंबई | यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारीला होणाऱ्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांचे हे आमंत्रण रद्द केले. यामुळे हा वाद आणखीनच पेटल्याचे चित्र दिसत आहे. या वादावर कलाकारांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. अभिनेते योगेश सोमण यांनी निर्माण झालेल्या या वादावर आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे.

“काही वर्षांपूर्वी एका साहित्य संमेलनामध्ये एका प्रतिथेयश साहित्यकला म्हणजे वयांनी बऱ्यापैकी जेष्ठ होते ते त्यांना जीवनामध्ये गुलाबजाम कमी पडले म्हणून परिसंवादाला जाण्याऐवजी भोजनाच्या मंडपामध्येच वाद घालताना आणि भांडताना पाहिले आणि ऐकले आणि माझी साहित्य संमेलनावरची वासनाच उडाली. त्यामुळे अमुक एका गोष्टीचा निषेध म्हणून मी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकतोय, असे मला म्हणता येणार नाही. कारण मी तिकडे जातच नाही. दुसरी गोष्ट मी पुरस्कार वापसी करू शकत नाही कारण माझ्या उजव्या हातात पुरस्कारच नाही. पण तरीही हा संवाद नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या जो की मराठी स्वातंत्र्याचा अत्युच्य उत्सव असतो. याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आणि नंतर ते निमंत्रण रद्द केले. या आयोजकाच्या निर्लज्जपणाचा मी तीव्र निषेध करतो,” असे अभिनेते योगेश सोमण म्हणाले.

ज्येष्ठ साहित्यिका सहगल आपल्या विचारसरणीच्या विरोधात काही विचार मांडतील असे वाटल्यामुळे जर आयोजकांनी हे निमंत्रण रद्द केले असेल तर हा आयोजकांचा भ्याडपणा आहे, अस मला वाटते. संमेलनाच्या व्यासपीठावर कोणालाही आपले विचार व्यक्त करण्याचेसंपूर्ण स्वतंत्र अससे पाहिजे आणि साहित्यिकाचे ते स्वतंत्र अबाधित राहिले पाहिजे.

Related posts

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील `हे मृत्युंजय’ नाटकाचा मुहूर्त

News Desk

#AirStrike : सिनेकलाकारांचा भारतीय वायु दलाला सलाम

News Desk

आता हिंदीतील हसवणूक पुन्हा सुरु

News Desk