HW News Marathi
मनोरंजन

सनी लिओनीचा ‘नाद खुळा’, खरेदी केली सव्वा कोटीची कार

मुंबई: सनी लिओनीच्या अदावर फिदा होणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे. आॅनलाइन सर्चमध्ये आजही सनी लिओनीचा कोणीही हात धरू शकलेले नाही. सनीने हे ग्लॅमर आपल्या हटके अंदाज व भूमिकामधून मिळवले आहेत. बॉलिवूडमधील अ‍ॅटम सॉँगमध्ये अनेकवेळा ती दिसते. यातून तिला बक्कळ पैसा मिळतो. काही दिवसापूर्वी तिला घर भाड्याने मिळत नव्हते. त्यानंतर तिने चक्क पाच बेडरुमचा बंगलाच खरेदी करून टाकला.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तिने अनोखी कार खरेदी केली आहे. सनीने खरेदी केलेल्या कारसोबत तिचा फोटो शेअर केला आहे. इटालीतील मसेराती कंपनीची सुमारे सव्वा लाख कोटी रुपये किमत असलेली महागडी कार खरेदी केली आहे. ही कार इटलीची प्रसिद्धी कार म्हणून ओळखली जाते. सनीकडे याच कंपनीची आणखी एक कार होती परंतु तिनं ती २०१४ साली पती डेनियल वेबरला वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिली. सनीनं ही कार अमेरिकेतून खरेदी केली आहे. सनी लिओनी सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vijay Diwas : भारत- पाक युद्धाविषयी थोडक्यात

News Desk

सण नारळी पौर्णिमेचा

News Desk

प्रियांका -निक ‘रोका’ सेरेमनीचा फोटो व्हायरल

News Desk