HW News Marathi
मनोरंजन

अधुरा प्रवास..त्याचा आणि तिचाही….

कृष्णा सोनारवाडकर | सकाळची 7 ची वेळ….आकाश बेडरूममधल्या आरामखुर्चीत चहाचे घोट घेत शांत बसला होताआज प्रेमाचा दिवस (valentine day) पण तरी आकाशच्या मनात अगदी जुन्या आठवांनींनी काहूर माजलं होत….प्रेम म्हणजे काय असत हे सगळ्या अनुभवातून तो पार शेकून निघाला होतापण आता जणू या प्रेम नावाच्या अधांतरी असणाऱ्या आयुष्यात त्याला खरंच रस वाटत न्हवता….मीनाक्षी….आकाशची प्रेयसीअगदी स्वतःपेक्षा जास्त जपलं होत आकाशने मिनाक्षीला….तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यात आयुष्याच्या या प्रवासात तो धावत होता…पण दोन वर्षांपूर्वी वेगाने जाणारी गाडीचा भयंकर अपघात व्हावा आणि सार काही एका क्षणात नष्ट व्हावं अगदी तसच काहीसं आकाशच्या आयुष्यात झालं होतं….

साधारण चार वर्षांपूर्वी मीनाक्षी आणि आकाशची ओळख झाली असेल हळूहळू हि मैत्री प्रेम नावाच्या अंकुरात बदलत गेली…प्रेम म्हणजे नक्की काय असत हे आकाश या दिवसांच्या सहवासात शिकला होता….पण आता त्याच आठवणी त्याला कटू वाटत होत्या….valentine day….. याच दिवशी दोघांची पहिली भेट झाली…..आकाशला या भेटीतून प्रेमाचा अर्थ समजला होतामीनाक्षी अतिशय हुशार आणि गरीब घराण्यातून मोठी झालेली मुलगी होतीपरिस्थिती गरीब आणि लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं पण तरी तिने तिचा निर्धार सोडला नाही जिद्दीने शिकली आणि चांगल्या नोकरीला सुद्धा लागली पण या सगळ्यांनंतर आईपेक्षा कोणीतरी जास्त समजून घेणार हवं होत म्हणूनच कि काय ती आकाशच्या प्रेमात पडली…..प्रेम वेड असत कधीही कोणालाही होऊ शकत याचा प्रत्यय तिला यातून आला होता…..

कॉलेज मध्ये एकमेकांकडे बघून फक्त हसणाऱ्या आकाश आणि मिनाक्षीला मनाच्या कोपऱ्यातून जाणवत होतं की आता एकमेकांना समोरासमोर भेटावं आणि मनातलं बोलून दाखवावं पण दोघांचीही अवस्था अगदी पाय बांधलेल्या घोड्यासारखी झाली होती….कोणीच बोलत न्हवत मनात मात्र प्रेम साठलेल होत…एक दिवस शेवटी न राहवून आकाशनेच आपल्या प्रेमाची कबुली देण्याचं ठरवलं….मोठी हिम्मत एकवटून तो मिनाक्षीसमोर जाऊन थांबला पण हातात पाठीमागे लपवलेल गुलाबाचं फुल हिम्मत जुठवूनही तो मिनक्षिसमोर ठेवू शकला नाही….तिच्या डोळ्यात पाहिल्यावर जणू शरीर बधिर होऊन थंड पडावं अशी अवस्था आकाशची झाली….आकाशच्या तोंडातून नकळत फक्त चारच शब्द फुटले ते कसे हे त्यालाही कळलं नाही…

‘उद्या 4 वाजता कोलेजवळच्या बागेत भेटशील???’ या प्रश्नावर समोरून उत्तर काय येणार आहे या उत्सुकतेने आपल्या कपाळाच्या आठ्या एकवटून आकाश वाट पाहू लागला…पण मिनक्षिच्या चेहऱ्यावर या प्रश्नाने स्मितहास्य पसरलं होत तिने मानेनेच होकार दिला आणि याच्या मनात अगदी आनंदाच्या उकळ्या फुटल्या….बरेच दिवस हिम्मत करूनही जिच्या पुढ्यात जायला इतका उशीर लागला त्या मुलीला आपण बागेत भेटायला बोलवावं आणि तिने होकार द्यावा याच्यापेक्षा मोठा आनंद काय असावा हे त्याच्या चेहऱ्याकडे बघून स्पष्ट जाणवत होतं…त्या आनंदातच अगदी भारावून तो घरी निघून गेला पण त्याला उत्सुकता होती ती दुसऱ्या दिवशी घड्याळात वाजणाऱ्या 4 वाजताची…..

ठरलेल्या वेळेप्रमाणेच तो तिची अर्धा तास अगोदरपासून बागेत वाट बघत बसला होता…14 फेब्रुवारी आणि प्रेमाचा दिवस म्हटल्यावर बागेत बरेच कपल्स त्यांच्या प्रेमाच्या विश्वात बुडून गेले होती…कोणी चेष्टामस्करी करत होते तर कोणी मनातल्या भावना एकमेकांसमोर ठेवण्यात व्यस्त होत…त्यांच्याकडे पाहून त्या जोडप्यांच्या चेहऱ्यात हा स्वतःचा आणि मिनक्षिचा चेहरा पाहत होता….

‘मला यायला थोडा उशीर झाला का’ या अचानक आलेल्या आवाजाने तो त्याच्या कल्पनेच्या विश्वातून जागा झाला बाजूला पाहिलं तर लाल ड्रेसमध्ये मीनाक्षी उभी होती…चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकता आणि हा काय बोलेल या प्रश्नाने तिचही मन थोडं अस्थिर झालं होतं…आकाशने नकळतच तिला हातानेच बाजूला बाकड्यावर बसण्याचा इशारा केला…15,20 मिनिटं अशीच निघून गेली दोघेही निशब्द आणि शांत बसलेले होते..दोघांनाही काय बोलावे काहीच सुचत न्हवत….

शेवटी मिनाक्षीने तोंड उघडलं आणि तिने आकाशला प्रश्न विचारला “काही बोलशील का आता कि इथे फक्त बसूनच घरी जाणार आहोत परत आपण”….??? मोठ्या धीराने मीनाक्षी हे बोलली होती…मग आकाशने सुद्धा हृदय घट्ट करून सरळ गुलाबाचं फुल मिनाक्षीसमोर धरलं आणि तिच्यासमोर आपल्या मनातलं प्रेम अगदी भराभरा व्यक्त केलं….शेवटी दोघांच्या मनातील गोष्ट स्पष्टपने त्यांच्याच समोर प्रकट झाली होती….दोघेही हातात हात धरून मावळत्या सूर्याची साक्ष घेत चेहऱ्यावर आनंद घेऊन जात होते..पहिलीच भेट तीही अगदी वेगळी…..

त्या भेटीनंतर दोघंचहि आयुष्य पुरत बदलून गेल होत…दोघांनीही “लग्न” केलं आणि एकमेकांच्या मनातल्या दडपून राहिलेल्या भावना एकमेकांसमोर मांडण्यात आणि साथ देण्यात प्रेमाची दोन वर्षे कधी संपली कळलंच नाही….

आज आकाश ला काही करून घरी लवकर पोहोचायचं होत…कारण मिनक्षिने बऱ्याच दिवसानंतर बाहेर जाण्यासाठी त्याच्याकडे विनंती केली होती…तिच्या या विनंतीखातर बॉसचा थोडा संताप सहन करत हातातलं काम बाजूला ठेऊन तो घाईघाईत ऑफिसमधून बाहेर पडला…लवकरात लवकर घरी पोचायचं आहे नाहीतर पुन्हा एक संतापाची लाट त्याच्या अंगावर येणार होती हे त्यालाही ठाऊक होत..या धावपळीतच अचानक वाजलेल्या फोनच्या रिंगने त्याच हात खिशाकडे गेला…नाव,नंबर काहीच पडलं न्हवत अनोळखी नंबर होता…

पलीकडून आवाज आला तुमच्या पत्नीचा अपघात झालाय आणि त्या अपघातात वाचू शकल्या नाहीत…या शब्दांनी कानठळ्या बसाव्या आणि पायाखालची जमीन सरकावी अशी अवस्था त्याची झाली…हातपाय गळून पडल्यासारखे झाले आणि मिनक्षिचा नेहमी हसरा असलेला चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला…पलीकडच्या माणसाने सांगितलेल्या दवाखान्यात अगदी अर्ध्या तासातच आकाश पोचला असेल…जाऊन पाहतो तर काय मीनाक्षी शांत बेडवर पडली होती चेहऱयावर ना कसल्या भावना होत्या ना कशाची चिंता सगळ काही नाहीस झालं होतं…दोघांनी रंगवलेली स्वप्न,आयुष्यभर साथ देण्याचं वचन सगळं काही अधुरच राहील होत…मीनाक्षी तर गेली पण आकाशच्या मनात असलेल्या आठवणी अजूनही त्याला विसरता येत नाहीयेत…प्रेम अजरामर असत ते कधी संपत नाही असं म्हणतात अगदी तसच काहीसं याच्या बाबतीत झालय…valentine day दिवशी मात्र याचा चेहरा आठवणींच्या समुद्रात बुडालेला असतो…

या दिवशी विचारहीन होतो अगदी तिच्या आठवणींच्या क्षणांत… ती आजही याच्यासाठी जिवंत आहे याचा मनात जी कायम असेल….रस्त्यावरून जोडपं जाताना नेहमी स्वतःचा आणि मिनक्षिचा चेहरा याला आजही दिसतो…आठवणी….चहा संपला होता…कप टेबलावर ठेऊन या सगळ्या क्षणाची आठवण आजच्या दिवशी आकाशला आठवलीय…पण डोळ्यात मात्र अश्रू साचलेत जे कधीहि विरणार नाहीत…कारण दोघांनाही एकमेकांची प्रेमाची साक्ष अजूनही ग्वाही देतीय…. एक प्रेम असंही……(valeentines day)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वडिल-मुली’च्या नात्याला समर्पित करणारे गाणे !

News Desk

पंडित नेहरूंचे लहान मुलांसोबतचे काही निवडक क्षण

News Desk

पर्रीकरांच्या निधनानंतर बॉलिवूडने केले दु:ख व्यक्त, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk