HW News Marathi
मनोरंजन

हिंसाचाराच्या आगीत कासगंज जळत आहे, या घटनेला योगी सरकार जबाबदार आहे का?

उत्तर प्रदेश | पुन्हा एकदा धार्मिक हिंसाचारच्या आगीत होरपळत आहे. २६ जानेवारीला कासगंज येथे दोन गटात हिंसाचारची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेत चंदन गुप्ता नावाचा २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून नौशाद नावाचा व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला आहे.

प्रजासत्ताक दिनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विश्व हिंदू परिषदने तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. हिंसाचाराची घटना न थांबल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या टीम, आरएएफ आणि पीएसी कडक बंदोबस्त करण्यात आला असून याठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे. कासगंज घटनेमागे अनेक गोष्टी सांगितल्या जात असून पोलिसांच्या वतीने वेगळे कारण सांगण्यात येत आहे. तर सोशल मिडिया आपल्या पद्धतीने ही घटना सांगत असून सोशल मिडिया ही घटना दादरी आणि अलवर कांड या दोन्ही घटनेशी संबंध जोड आहे. ही रॅली जेव्हा कासगंज येथील बलीराम या ठिकाणी पोहचल्यानंंतर एक गटाने वन्दे मातरमची घोषणा देण्यास सुरुवात केली असून दुसऱ्या गटाला जबरदस्ती वन्दे मातरम ची घोषणा देण्यास सांगतल्याचा आरोप स्थानिक लोकांनी सांगितले आहे.

दोन्ही गटातील लोकांनी एकमेकाशी वाईट वर्तन केले असून ही घटना हाता बाहेर निघून केल्यानंतर गटातील लोकांनी एेकमेंकावर दगड फेक करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा कोणी तरी बंदूक घेऊन आले आणि काही विचार न करता गोळी मारयला सुरुवात केली. यात चंदन गुप्ता या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर या हिंसाचाराने रौद्र रुप धारन केले. नौशात गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. चंदन गुप्ताचा मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूला विरोध करण्यासाठी परिसरात दगड फेक आणि जाळपोळीच्या घटना सुरु झाल्या.

या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून देखील काही ठिकाणींच्या जाळपोळीच्या घटना होत आहेत. पोलिसांनी रविवारी ८० जणांना ताब्यात घेतले असून यांची चौकशी केल्यानंतर या आरोपींकडे देशी बंदूक आणि बॉम्ब सापडले आहेत. पोलिसांनी या परिसरातील लोकांना शांतता ठेवण्याचे आव्हान केले आहे. दोन्ही गटात झेंड्यावरुन वाद झाला असल्याचे सांगतले जात आहे. पण, झेंड्यावरुन वाद न होता, हा वाद रस्त्यावरुन झाल्याचे कळत आहे. एका गटाने बदूदनगर येथील रस्त्यात खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. तर दुसऱ्या गटाने या खुर्चा काढायला सांगतल्या होत्या. यातून वाद निर्माण झाल्यानंतर गोळी चालवण्यात आली.

वन्दे मातरमच्या घोषणा देण्यात आल्यानंतर त्याचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देण्यात असल्याचे सोशल मिडियात वायरल होत आहेत. हे सर्व असत्य असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तिरंगा रॅली विरोधात रॅल बिना या दोघांमध्ये वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यात राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय देखील दर्शविण्यात येत आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने देखील पोलिस चौकशी करत असून पोलीस या घटने संदर्भात HW न्यूज नेटवर्क बोलताना उत्तर प्रदेश पोलिसचे एडीजी आनंद कुमार सांवध भूमिका घेत सांगितले की,’ २६ जानेवारीला एका बाजूला तिरंगा यात्रा सुरू होती. दुसरी यात्रा एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्याच्या रस्त्यावर वाद झाला असून ही घटनेला पोलिस प्रत्येक एंगलने चौकशी करत आहे.’ आनंद कुमार यांनी पुढे सांगितले की, तिरंगा यात्रा काढण्यावर बंदी नाही.

ही यात्रा कधी ही आणि कुठे ही काढू शकतात. कोणी कोणाला काही बोले तर तुम्ही दगड फेकणार का? गोळी मारणार का? हे काय जंगल राज नाहीये. कायदा ही असा सांगतो की, आत्मरक्षासाठी चालवणासाठी तुम्ही गोळी चालव शकता. तेव्हा नाही जेव्हा तुम्हाला वाटेल की, समोरचा व्यक्ती तुम्हाला गोळी मारुन टाकेल. शिवीगाळीचे उत्तर गोळी आहे का? दगड फेक करण्यात आली? शिवीगाळीचे उत्तर गोळीत देणे दिले पाहिजे का? हे मला जे सांगायचे होते ते मी स्पष्टपणे सांगितले. या घटनेनंतर राजकार होणे साहाजिकच आहे. या प्रकरणात भाजपने प्रत्येक स्तरावर चूकीचे निर्णय घेण्यात आले असल्याचे बसपा प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मायवतीने असे बोलत भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपवर आता विश्वास राहिला नसल्याचे सपाचे प्रवक्ता राजेंद्र चौधरींनी म्हटले आहे.

प्रशासन तयार असे तर अशा प्रकारची घटनाच घडली नसती असे काँग्रेस यूपीचे अध्यक्ष राज बब्बर यांनी म्हटले. दुसरीकडे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंहने सांगितले की, दुसरे पक्षानी पहिलीच हिंसाचार करण्याची तयारी केली होती. कारण थोड्याच वेळात दोन्ही गटाकडे हत्यार कसे उपलब्ध झाले. कासगंज हिंसाचारनंतर योगी आदित्यनाथ सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले जाते आहेत. तीन दिवस होऊन ही सरकार हिंसाचाराच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यास असफल ठरली आहे. सरकारने या घटनेवर योग्य कारवाई केली असती तर या घटनेने मोठे स्वरुप घेतले नसते. २६ जानेवारीच्या दिवशी संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त नव्हात जर पोलिस बंदोबस्त होता मग लॉ एंड ऑर्ड कसे काय बिघडले. योगी आदित्यनाथ प्रदेशातील लोकांना सुरक्षा देण्यास असफल आहे. या घटनेची चौकशी आणि कारवाईत योगी सरकाराची कामगिरी निराशाजवक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संगीत सम्राट पर्व २चा विजेता आज ठरणार

News Desk

इंडियन आयडाॅलच्या स्पर्धकाला १ लाख ७० हजारांचा गंडा

News Desk

आगमन बाप्पाचे | विश्वकर्ता कला निकेतनचा ‘नॅनो गणेशा’

News Desk