HW Marathi
मनोरंजन

मी काय बोलावे किंवा नाही, हा माझा मुद्दा आहे !

पुणे | सरकारवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे भाषण रोखण्याचा प्रकार घडला आहे. या संपूर्ण प्रकरणा पालेकरांनी आज (१० फेब्रुवारी) पुण्यात पत्रकार परिषद नाराजी व्यक्ती केली. “प्रभाकर बर्वे या चित्रकाराच्या प्रदर्शनासाठी मी नॅशनल गॅलरी ऑफ ऑर्ट (एनजीएमए) येथे गेलो होतो. त्यावेळी मी काय बोलावे किंवा नाही, हा माझा मुद्दा आहे. पण, मी आर्ट गॅलरीचे कौतुक करायचे होते. ते देखील मला करून दिले नाही, सतत मी बोलताना थांबविण्यात आल्याचा आरोप पालेकरांनी एनजीएमएच्या डिरेक्टरवर केला आहे.”

“आयोजकांनी एखाद्या वक्त्याला आधीच  सांगायला पाहिजे, की काय बोलायचे आणि काय नाही. त्यामुळे हे किंवा ते बोलू नका, असे सांगणे चुकीचे आहे. एनजीएमए संस्था आणि त्यामध्ये झालेले बदल याबद्दल बोलणे हे चुकीचे कसे ठरेल. या संग्रहालयात प्रभाकर बर्वेंचे प्रदर्शन हे कदाचित शेवटचे प्रदर्शन ठरण्याची शक्यता आहे. कारण आता ज्या नवीन डिरेक्टर आल्या आहेत. त्यांच्या नवीन धोरणानुसार, त्यामध्ये चार मजले हे एनजीएमएच्या कलेक्शनसाठी वापरायचे आणि उर्वरीत एक मजला इतर प्रदर्शनासाठी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे मला आणि माझ्यासारख्या कलावंतांना हा मोठा धक्का असल्याचे पालेकर म्हणाले. तसेच पूर्वनियोजत दोन विख्यात कलाकारांचे प्रदर्शनही ऐनवेळी रद्द करण्यात आले आहेत, मी त्याबद्दलच बोलत होतो, असेही पालेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ”

नेमके काय आहे प्रकरण

मुंबईतील एनजीएमए शनिवारी (९ फेब्रुवारी)  कार्यक्रमात सरकारवर टीका केल्यामुळे पालेकर यांचे भाषण रोखण्याचा प्रकार घडला आहे. पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एका निर्णयाविरोद्ध आपली भूमिका मांडली होती. त्यावेळेस कार्यक्रमाच्या डिरेक्टरने त्यांना त्यांचे मत मांडण्यापासून रोखले. पालेकरांच्या भाषण करत असताना डिरेक्टरने त्यांना बऱ्याचदा रोखले. यानंतर पालेकरांना लवकरच भाषण  संपवण्यासही सांगितले होते. सरकारी प्रतिनिधीच्या या प्रकाराबद्दल

 

 

Related posts

‘काला’ सिनेमा सुपरस्टारचा सुपर शो

News Desk

किंग खानने घेतली दिलीप कुमार यांची भेट

News Desk

रणवीर-दीपिकाच्या विवाहावर शीख समुदाय नाराज

News Desk