HW News Marathi
मनोरंजन

लोकशाहीर गफूरभाई पुणेकर पंचतत्वात विलीन

पुणे | महाराष्ट्राचे कलाभुषण व लोकनाट्य-चित्र-कलाकार कल्याण मंडळ,महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लोकशाहीर व गफूरभाई पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे संस्थापक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गफूरभाई पुणेकर यांचे दीर्घ आजारामुळे १० जून रोजी पुण्याच्या हडपसर येथे निधन झाले.

त्यांच्यावर ११ जून रोजी (सैय्यद नगर)हडपसर सेल्सबरी पार्क येथे दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कलाभुषण शाहीर गफूरभाई पुणेकरांनी गेली ५० वर्ष रंगभूमीवर अनेक लोकनाट्य तमाशा, नाटकं,एकपात्री नाटकं, नकला, बहुरुपी भारुडं, बहुरुपी शाहीरी, अध्यात्म चरित्राची शाहीरी पोवाडे,शिवचरित्र शाहीरी पोवाडे,आध्यत्मिक किर्तन,प्रवचनं अशा सर्व कलांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रसिकांची सेवा व मनोरंजन केले आणि महाराष्ट्राची परंपरा जपणार्‍या कला जीवंत ठेवण्याचे अनमोल कार्य केलेले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी बिग बॉसच्या अंतिम फेरीची तयारी जल्लोषात सुरु…

News Desk

Kumbh Mela 2019 : जाणून घ्या… कुंभमेळ्याचे धार्मिक महत्व

News Desk

आगमन बाप्पाचे | २१ विविध प्रकारच्या मोदकांचा प्रसाद

News Desk