HW News Marathi
मनोरंजन

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला ५ वर्षाची शिक्षा 

जोधपूर | गेल्या १९ वर्षपासून सुरु असलेल्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात सलमानला वन्यजीव संरक्षण अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. या कायद्या अंतर्गत ५ वर्षाची शिक्षा झाली असून १० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. जोधपूरच्या तुरुंगात सलमानची रवानगी करण्यात येणार आहे. काळवीट शिकार केल्याचा आरोप असलेल्या सैफ अली खान,अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू सर्वांना कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

  • काळवीट शिकार प्रकरण

‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यान सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू जोधपूरमध्ये गेले होते. या शुटिंग वेळी घोडा फार्म हाऊस येथे सर्व कलाकार थांबले होते. या शुटिंग दरम्यान भवाद गावात काळवीटची शिकार केल्याचा आरोप कलाकारांवर केला गेला. कांकाणी प्रकरण, घोडा फार्म हाऊस, भवाद प्रकरण आणि आर्म्स अ‍ॅक्ट या चार ही काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यापैकी घोडा फार्म हाऊस काळवीट शिकार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १० एप्रिल २००६मध्ये सलमानला ५ वर्षाची शिक्षा, तर भवाद गावातील प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १७ फेब्रुवारी २००६ रोजी सलमानला एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. १८ जानेवारी २०१७ रोजी आर्म्स अ‍ॅक्ट या प्रकरणात सुद्धा सलमानला निर्दोष ठरवले आहे. या तिन्ही प्रकरणात उच्च न्यायालाने सलमानला निर्दोष ठरवले आहे. राज्य सरकारने तिन्ही प्रकरणाच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहा… ‘मी टू’ मोहिमेबाबत काय म्हणाले अनिल कपूर

Gauri Tilekar

जाणून घ्या… टाकाऊपासून टिकाऊ कंदील कसे बनवायचे

swarit

सचिन… सचिन….

News Desk