माधुरीने स्वतःच्या ‘आर एन एम मूव्हिंग पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड’द्वारा एका मराठी चित्रपटाची निर्मिती करायचं ठरवलंय. याचं दिग्दर्शन स्वप्ननील करणार असून, लेखन योगेश विनायक जोशी यांचं आहे. लवकरच चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांची निवड करण्याचं काम पूर्ण होईल. नितीन वैद्य या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असतील. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. एकीकडे परदेशात माधुरीवर मालिका बनत असताना, दुसरीकडे ती स्वतः मराठीत येण्यासाठी सज्ज झाल्यानं तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
या नवीन प्रोजेक्टबाबत आम्ही खूप उत्सुक आहेत. त्यासाठी काम करणारी टीमही भन्नाट आहे. आता सिनेमाचं शूटिंग कधी सुरू होतंय याची मला उत्सुकता आहे. सहकुटुंब बघता येईल असा हा सिनेमा असेल, असे माधुरीने नव्या चित्रपटाबद्दल सांगितले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post