HW News Marathi
मनोरंजन

कोमसापच्या अध्यक्षपदी पुन्हा डॉ. महेश केळुसकर

ठाणे : कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षपदी तिसऱ्यांदा ख्यातनाम कवी डॉ महेश केळुसकर यांची बहुमताने फेर निवड झाली आहे. डहाणू येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत केळुसकर यांची निवड करण्यात आली. गेली सहा वर्षे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती देत त्यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्यासह सर्व विश्वस्तही उपस्थित होते.

याबाबत बोलताना केळुसकर म्हणाले, तरुण ताज्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर ,राजधानी मुंबईतून हद्दपार होत असलेल्या मराठी माणसाच्या व भाषेच्या हितासाठी , कोमसाप मराठी शिक्षण कायदा व भाषा प्राधिकरण निर्माण व्हावे म्हणून लोकजागृती करेल . वनसाहित्य सम्मेलन , बोली नाट्य महोत्सव , कैदी बंधु -भगिनी साहित्य मेळावा , राज्यस्तरीय युवा साहित्य सम्मेलन आणि नवोदित पत्रकारांसाठी माध्यम प्रशिक्षण शिबीरे हे उपक्रम येत्या वर्षभरात आयोजित करण्यात येतील .” असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

नवी कार्यकरणी खालील प्रमाणे

डॉ.महेश केळुसकर -केंद्रीय अधक्ष /प्रा.अशोक ठाकूर -उपाध्यक्ष / नमिता कीर -कार्याध्यक्ष / रवींद्र आवटी – सह कार्यध्यक्ष / शशिकांत तिरोडकर व माधव अंकलगे -कार्यवाह / प्रकाश दळवी -कोशाध्यक्ष / सदस्य – प्रशांत परांजपे , मंगेश मसगे , संजय गुंजाळ ,सुधाकर चव्हाण , शिवाजी गावडे ,चंद्रशेखर गोखले ,प्रशांत डिंगणकर, मोहन भोईर,प्रवीण ना.दवणे झपूर्झा ‘ त्रैमासिकाचे नवे संपादक शिवाजी गावडे आणि दत्तात्रैय सैतवडेकर.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शुभं भवतु’ चित्रपटाचा शानदार मुहूर्त

News Desk

नरेंद्र मोदींच्या संघ विचारधारेवर महेश भट्ट यांची टीका

News Desk

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk