HW News Marathi
मनोरंजन

काळवीट शिकार प्रकरणी १७ जुलैला होणार पुढील सुनावणी

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणात सुनावण्यात आलेल्या ५ वर्षाची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खानने दाखल केलेल्या याचिकावर सोमवारी सुनावणी झाली. या खटल्याची पुढील सुनावणी १७ जुलैला होणार आहे. या सुनावणीसाठी सलमान खानने जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयात हजेरीदेखील लावली.

दोन काळविटांची २० वर्षांपूर्वी शिकार केल्याप्रकरणात जामीन मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सोमवारी पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर झाला होता. १९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने ५ एप्रिलला सलमान खानला दोषी ठरवत, पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय, न्यायालयाच्या संमतीखेरीज त्याला देशाबाहेरदेखील जाता येणार नाही, असाही आदेश दिला. ”हम साथ-साथ है!”, सिनेमाच्या शुटिंगदरम्यानची ही घटना आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MeToo : नानांसह चौघांवर ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

News Desk

९ डिसेंबरला विक्रांत सरंजामेचा ‘प्रपोज डे’? 

News Desk

‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर लाँच

News Desk