HW News Marathi
मनोरंजन

#MeToo : या संगीतकारांची ‘इंडियन आयडल’चा जजपदावरून हकालपट्टी

मुंबई | #MeToo मोहिमे अंतर्गत बॉलवूडमधील प्रसिद्ध संगीतकर अनु मलिकवर चार महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अनु मलिक यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे सोनी टीव्हीवर सध्या सुरू असलेल्या इंडियन आयडलमध्ये ते परिक्षकपद हकालपट्टी करण्यात आली आहे. श्वेता पंडित आणि सोना मोहपात्रा या दोन्ही गायिकांनी अनु मलिकवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अजूनही दोन महिलांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. परंतु या महिलांनी त्यांचे नाव जाहीर केलेले नाहीत, अशा चार महिलांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे.

नाव न जाहीर करण्याच्या दोन्ही महिलापैकी एक महिला ही काही वर्षापुर्वीच्या इंडियन आयडलची स्पर्धक राहिली आहे. तर दुसऱ्या महिलेने तिच्यासोबत झालेल्या घटनेचे कथन करून अनु महिलवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. तिने म्हटले आहे की, ‘अनू मलिक यांच्या घरी गेले असता, सोफ्यावर ते माझ्या बाजूला येऊन बसले आणि त्यांनी माझा स्कर्टवर करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना ढकलून पळण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झाले नाही. नशिबाने तेव्हा कोणीतरी दार वाजवले, पण या प्रसंगाबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली.

अनु मलिक हे सध्या ‘इंडियन आयडल’चे दहावे सीझन जज करत आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांना या पदावरून हटवावे, यासाठीचा दबाव वाढला आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, या दबावानंतर सोनी टीव्हीने अनु मलिक यांना ‘इंडियन आयडल १०’च्या परिक्षकपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत अनु या शोमध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे पुढील काही एपिसोडमध्ये अनु मलिक नसणार, असे या शोशी संबंधित सूत्रांनी माहिती दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या दिवाळीत करून पहा गव्हाची शंकरपाळी

News Desk

आगमन बाप्पाचे | गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर, मूर्तिकारांच्या हातांना वेग

Gauri Tilekar

गुलमोहर फुलला

swarit