मुंबई | बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अनेक नामवंत कलाकारांवर या मोहिमे अंतर्गत आरोप झाले आहेत. त्यापैंकी बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांचे नाव आले आणि सर्वांच्याच भुवाया उंचावाल्या. यानंतर आलोक नाथ यांना अजून एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर आज आलोक नाथ यांना सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टाने कठोर कारवाई करत त्यांचे सदस्यत्व रद्द केलेय.
आलोक नाथ यांच्यावर बॉलिवूडमधील अनेक महिलांनी लैंगिक शोषण व गैरवर्तनाचे आरोप केले होते. याआरोपनंतर सिन्टाच्या एक्झिक्युटीव्ह कमेटीने त्यांना असोसिएशनमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे सिन्टाने आपल्या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिले आहे.
In view of the various allegations of sexual harassment and misconduct against Mr. Alok Nath, after due diligence and consideration, the Exec. Committee of #cintaa has decided to expel him from the Association. @sushant_says @renukashahane @FIA_actors @sagaftra @RichaChadha pic.twitter.com/tcNgooWLW6
— CINTAA_Official (@CintaaOfficial) November 13, 2018
काही दिवसांपूर्वी सिन्टाने आलोक नाथ यांना नोटीस बजावली होती. यावर आलोक नाथ यांनी आपल्यावरील सर्व आरोप धुडकावून लावले होते. विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मद्यात काही तरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला होता. विनता नंदा यांच्याशिवाय अभिनेत्री संध्या मृदुल हिनेही आलोक नाथवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. याशिवाय अभिनेत्री रेणुका शहाने हिनेसुध्दा आलोक नाथ यांच्यावरील आरोप खरे असल्याचे सांगितले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
previous post