मुंबई | सध्या खूप चर्चेत असलेल्या ‘मी टू’च्या मोहिमेनंतर अभिनेता अनिल कपूर यानेही ‘मी टू’ बाबत आपले मत व्यक्त केले आहे. ‘आपल्यावरील अत्याचाराला महिला उघडपणे वाचा फोडत आहेत, ही खूपच चांगली बाब आहे. जगाने या विषयाकडे मोकळेपणाने पहिले पाहिजे आणि स्त्रियांना काय सांगायचे आहे ते ऐकले पाहिजे,’ अशा शब्दांत अनिल कपूर यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. ‘माझ्या घरातही महिला आहेत माझी बायको, माझ्या मुली आणि या तिघीही स्वतंत्र आहेत. मी त्यांचे ऐकतो आणि जगानेही महिलांचे म्हणणे ऐकायला हवे,’ असे अनिल कपूर म्हणाले आहे. ते म्हटले की, ‘माझ्यासाठी महिला समान नाहीत तर प्रत्येक बाबतीत पुरुषापेक्षा सुपिरिअर आहेत. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत असेल तर ते चांगलेच आहे.’
I have three women in my house & they're fiercely independent. I'm a listener&I think world should also be a listener & listen to whatever they have to say. For me, girls are superior in every aspect & I have said that always. What is happening is fantastic: Anil Kapoor on #MeToo pic.twitter.com/FvRfMBkrBQ
— ANI (@ANI) October 11, 2018
‘मी टू’ या चळवळी अंतर्गत बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर अन्य महिलाही पुढे आल्या आहेत. आलोक नाथ, विकास बहल, रजत कपूर, सुभाष घई अशा दिग्गजांची नावे पुढे आली. या संदर्भात एका कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारल्यानंतर अनिल कपूरने ही भूमिका व्यक्त केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.