HW News Marathi
मनोरंजन

#MeToo: सुभाष घई यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई | लैंगिक शोषणाच्या विरोधात सुरु असलेल्या मोहीमेमुळे बॉलीवुडमधील अनेक ज्येष्ठ कलाकार अडचणीत आल्याचे पहायला मिळत आहे. अनेक महिलांनी कलाक्षेत्रात आपल्याला आलेल्या वाईट अनुभव शेअर करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर साजिद खान, अभिनेते नाना पाटेकर, अलोक नाथ, कैलाश खेर, रजत कपूर, चेतन भगत आणि गुरसिमरन खंबा यांची नावे समोर आली आहेत. असे आरोप करणा-या महिलांमध्ये अभिनेत्री केट शर्माचा देखील समावेश आहे. केट ने दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. तीने या संदर्भात सुभाष घई यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे.

केटने असा आरोप केला आहे की ६ ऑगस्ट रोजी सुभाष घईंनी यांनी वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त करुन मला बोलावून घेतले होते. त्यानंतर त्यांनी जवळ बोलवून सर्वांच्या समोर बॉडी मसाज देण्यासाठी सांगितले. एएनआय या वृत्त एजन्सीशी बोलताना केट शर्मा म्हणाली, सुभाष घई यांना बॉडी मसाज दिल्यानंतर मी माझे हात धुण्यास गेले तेव्हा घई यांनी माझा पाठलाग केला. सुभाष घई माझ्या मागे आले आणि मला एका खोलीत बोलण्यासाठी बोलावले, त्या वेळी त्यानी मला किस करण्याचा प्रयत्न केला.

५-६ लोक होते उपस्थित

केट ने दिलेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी ५-६ लोक उपस्थित होते. केटच्या आरोपानंतर मुंबई स्थित वर्सोवा पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची नोंदणी करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाॅलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

News Desk

#KaderKhan : संवाद लेखक ते अभिनेता, कादर खान यांचा रोमहर्षक प्रवास

News Desk

मराठी बिग बॉसच्या अंतिम फेरीची तयारी जल्लोषात सुरु…

News Desk