HW News Marathi
मनोरंजन

मोरुची मावशीचे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन

पुणे : मोरूची मावशी’ या विनोदी नाटकाने रंगभूमीवर धुमाकूळ घातला होता. मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे आज पुण्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कोल्हटकर यांच्या पश्चात सासू आणि मुलगी असा परिवार आहे.

आपल्या प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील मुशाफिरीत त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांची ‘कवडी चुंबक’, ‘राजाचा खेळ’, ‘मोरूची मावशी’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ ही नाटके विशेष गाजली. १९८४च्या ‘पार्टी’ आणि १९९१ च्या ‘शेजारी शेजारी’ या दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले. त्यामध्ये ‘गोड गुलाबी’ आणि ‘ गोष्ट जन्मांतरीची’ या नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले.

दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या नाटकांसाठी त्यांनी काहीकाळ नेपथ्य आणि प्रकाशयोजनेचे देखील काम केले होते. तसेच विजया मेहता यांच्या ‘जास्वंद’ नाटकामध्ये त्यांनी काम केले होते. ‘चिरंजीव आईस’ या भाग्यश्री देसाई निर्मित नाटकाचे देखील ते दिग्दर्शक होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माटुंग्याच्या फुलमार्केटमध्ये गणेश भक्तांची गर्दी

News Desk

भाऊबीजेच्या सणामागची कथा तुम्हाला माहिती आहे का ?

Gauri Tilekar

Gandhi Jayanti : राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाहून विनोद तावडेंचा ‘आवाज’ चढला

swarit