HW News Marathi
मनोरंजन

‘शुभं भवतु’ चित्रपटाचा शानदार मुहूर्त

मुंबई | सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखले जाते. २४ तास आपण या तंत्रज्ञानाच्या गराड्यात अडकलेले असतो. आज प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञानाने काबीज केले आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आवश्यक आहे. एकविसाव्या शतकात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना रूढी, परंपरा, संस्कृती आणि संस्कार यांचा अभिजात वारसा आपण विसरत चाललो आहोत. या तंत्रज्ञानाशी नातं जुळताना आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ आपण तोडत तर नाही ना? तंत्रज्ञानाच्या प्रवाहात वाहत जाताना आपल्याला आपल्या संस्कारांचा विसर तर पडत नाही ना? अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘ओम श्री चित्र प्रायव्हेट लि.’ प्रस्तुत ‘शुभं भवतु’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्या हस्ते पुण्यात संपन्न झाला. या चित्रपटात सौरभ गोखले नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘शुभं भवतु’ हा चित्रपट आत्ताच्या पिढीला विचार करण्यास प्रवृत्त करेल आणि तंत्रज्ञानासोबत संस्कृतीची सांगड घालताना आपल्या प्राचीन आणि उदात्त संस्कृतीचे महात्म्य अधोरेखित करेल अशी अपेक्षा आहे. सौरभ गोखलेसोबत सुखदा खांडकेकर, समीर धर्माधिकारी, कांचन गुप्ते, योगेश सोहोनी हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते आणि गीतकार डॉ. शरद नयमपल्ली आणि साधना नयमपल्ली असून प्रसिद्ध दिग्दर्शक निरंजन पत्की चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. कथा, पटकथा, संवाद आणि छायांकन सुनील खरे यांचे असेल तर ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत चित्रपटाला लाभणार आहे. नरेंद्र भिडे हे चित्रपटाला पार्श्वसंगीत देणार आहेत. कुणाल निंबाळकर हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

Aprna

अभिनेता सैयद बदरुल हसन खान बहादुर यांचे निधन

News Desk

जाणून घ्या… पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कधी येणार

News Desk
मुंबई

भावी पोलिसांसाठी मनसे आली धावून

News Desk

नवी मुंबई | राज्यभरातून पोलीस भरतीसाठी मुंबईत येणा-या ग्रामीण भागातील तरुणांचे नेहमीच हाल होतात. यावर अनेकदा बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. आरोप प्रत्यारोप होतात मात्र कोणीही या तरुणांची मदत करताना दिसून येत नाही. मात्र यावेळी नवी मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्याच्या व्यवस्था करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तरुणांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत पहायला मिळत आहे.

नवी मुंबईत मनसे कार्यकर्ते गजानन काळे यांनी या पोलीस भरतीसाठी आलेल्या सुमारे ४०० ते ५०० मुला-मुलींची रहाण्याची व जेवण्याची व्यवस्था केल्यामुळे नवी मुंबई ग्रामीण बेरोजगार तरुणांसाठी मनसे धावून आली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागातून भरतीसाठी आलेल्या तरुणांना नेहमीच रात्रीच्या वेळी पदपथावर झोपावे लागते. दरवर्षीच्या या समस्यांवर तोडगा काढत मनसे कार्यकर्त्यांनी केलेली ही व्यवस्था सध्या नवी मुंबईत चर्चेचा विषय ठरली आहे.

Related posts

व्यापाऱ्यांना फटाका विक्री परवान्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत

News Desk

मराठा पक्ष स्थापनेचा घोषणा?

News Desk

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk