Site icon HW News Marathi

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

मुंबई | प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे निधन झाले आहे. राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वासातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या 42 दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. राजू श्रीवास्तव यांच्यावर एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया देखील झाली होती.

राजू श्रीवास्तव यांच्या तब्यातीची माहिती मिळाताच देशभरसह विदेशातील चाहते प्रार्थना करत होते. पण, आज अखेर राजू श्रीवास्तव त्यांची प्राणज्योत मालवली. राजू श्रीवास्तव जिममध्ये वर्कआऊट करत असताना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर एम्स रुग्णालयात करण्यात आले होते. यानंतर राजू श्रीवास्तव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर राजू श्रीवास्तव यांची  अँजिओग्राफी करण्यात आली होती. तरी देखील राजू श्रीवास्तव यांची तब्यात सुधारण्याऐवजी त्यांची प्रकृती खालवत गेली.

 

राजू श्रीवास्तव यांचा अल्प परिचय

राजू श्रीवास्तव यांनी ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून करिअरला सुरुवात केली होती. राजू श्रीवास्तव यांनी ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा काम केले आहेत. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.परंतु, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून राजू श्रीवास्तव यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या कार्यक्रमातून राजू श्रीवास्तव यांनी ‘गजोधर भैया’चे पात्रने त्यांनी यूपीचा वेगळा अंदाज दाखवला. यामुळे राजू श्रीवास्तव यांनी चहात्यांच्या मनात अधिराज्य गाजविले.

संबंधित बातम्या

प्रसिद्ध कॉमेडिअन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंक नाजूक; चाहत्यांच्या चिंतेत वाढ

Exit mobile version