HW News Marathi
मनोरंजन

रुद्रम मालिकेतून मुक्ता बर्वे पुन्हा छोट्या पडद्यावर

मुंबई – काही दिवसांपूर्वी मुक्ता बर्वे हिने तिच्या सोशल प्रोफाइलवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात ती ‘तुम्हाला सत्य कळायलाच हवं, मी तुम्हाला सत्य सांगायला हवं’, असं कॅमेऱ्यासमोर म्हणत आहे. त्यानंतर हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला आणि निरनिराळे तर्कही लावले गेले. आता त्या व्हिडिओचा नेमका आशय सापडला आहे. ७ ऑगस्टपासून मुक्ता प्रेक्षकांना छोट्या पदड्यावर रोज भेटायला येणार आहे. हा व्हिडीओ त्याचाच एक भाग आहे.

झी युवा वाहिनीवर रुद्रमनावाची एक नवीन मालिका सुरू होत आहे. त्यातूनच आपल्याला मुक्ता भेटायला येणार आहे. नात्यांच्या सुरक्षित चौकटीत, हसत खेळत आनंदी जीवन जगणाऱ्या व स्वतःचे कुटुंब हेच विश्व मानणाऱ्या सर्वसाधारण स्त्रीच्या आयुष्यात, जेव्हा एखादं अनपेक्षित वादळ येते,तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होतं. आणि मग हीच सर्वसाधारण स्त्री, तिच्या भोवतालची सुरक्षित चौकट मोडून अन्यायाचा मागोवा घेते. एक अनपेक्षित अनुभव देणाऱ्या तीच्या प्रतिशोधाचा थरार म्हणजेच झी युवावर नवीन येणारी ही मालिका रुद्रम‘.

एका लग्नाची दुसरी गोष्टया मालिकेनंतर बऱ्याच वर्षांनी मुक्ता बर्वे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहे. रुद्रमया मालिकेत तिच्यासोबत वंदना गुप्ते, सतीश राजवाडे, मोहन आगाशे, संदीप पाठक, किरण करमरकर, मिताली जगताप, सुहास पळशीकर, विवेक लागू, सुहास शिरसाट,सई रानडे, अनिरुद्ध जोशी, मिलिंद फाटक, सुनील अभ्यंकर, आनंद अलकुंटे, किरण खोजे, आशिष कुलकर्णी आणि अशा उत्तमोत्तम नामांकित कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यामुळेच रसिकांसाठी ही मालिका एक मेजवानी ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

FLASHBACK 2018 : भारतीय अंध क्रिकेट संघ जगात सरर्वोत्तम

News Desk

अभिनेता सलमान खानला वनविभागाची नोटीस

News Desk

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान यांचे निधन

News Desk