HW News Marathi
मनोरंजन

मुंबईत अंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे भुमी पूजन गडकरींच्या हस्ते

मुंबई – मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने अंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल उभारण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तेगुरुवारी दुपारी १२ वाजता भूमी पूजन करण्यात आले. हे टर्मिनल २०१९ पर्यंत क्रुझचे काम पुर्ण करण्यात येणार आहे. या टर्मिनलमुळे मोठमोठ्या क्रुझ मुंबईमध्ये दाखल होतील. यामुळे पर्यटना व्यवसायला मोठा फायदा होईल.

 

क्रुझचे स्वरुप

हे ट्रमिनलचे काम तीन भागात टप्यात पुर्ण होणार आहे. पहिल्या टप्यात आवश्यक पाया उभारणार असून यात १९७ करोड रुपये खर्च होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुसऱ्या टप्यात इलेक्ट्रिकल कामे होतील. तसेच तिसऱ्या अंतिम टप्यात क्रुझसाठी पार्किंग आणि देखभालची सोय करण्यात येणार आहे. हे टर्मिनल ७०० एकर जागेमध्ये बांधण्यात येणार असून यात अत्याधुनिक सोयी-सुविधाने परिपुर्ण असणार आहे. या क्रुझच्या बांधकामासाठी एकूण ३०० करोड रुपये खर्च होणार आहेत. या ट्रर्मिनलमध्ये ५००० प्रवासी क्षमता असणार आहे.

“मुंबईत जर क्रुझ टर्मिनल झाले तर या क्रुझमधून किती लोक प्रवास करतील हे सांगणे कठीण आहे. पण, टर्मिनल पाहण्यासाठी लोक मात्र गर्दी करतील. यातून देखील पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. भू-मार्गातून नवीन मेट्रोचे जाळे असो वा जल मार्गातून प्रवास करण्यासाठी क्रुझ टर्मिनल आणि दहा हजार सी-विमान देखील उडविण्यात येणार आहे. भू-स्थल, जल आणि वायू मार्गावर भाजप सरकाराचे अधिराज्य दिसून येत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलत होते.”

‘भारतातील लोकांना क्रुझने जग फिरायचे असेल तर त्यांना मुंबईतून सिंगापूरमधील क्रुझ टर्मिनला जावे लागते. मुंबईत क्रुझ टर्मिनल नाही तरी गेल्या वर्षभरात ८० पेक्षा जास्त क्रुझ मुंबईत दाखल झाल्या होत्या. या अंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलने भारतील जनतेला मुंबईत टर्मिनलमधूनच प्रवास करणे शक्य होणार आहे. तसेच अंतरराष्ट्रीय क्रुझ मुंबई टर्मिनलामुळे पर्यटन व्यवसायला खूप चालना मिळणार आहे. तसेच स्थानिक युवकांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच मुंबईल ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी अनेक नवीन प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे देखील केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यावेळी बोलत होते.

नौदलाचा पाया हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला असून देखली आपण त्यांना विसरलो असल्याची वाईट खासदार अरविंद सावंतनी यावेळी व्यक्त केली असून या अंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनला महाराजांचे नाव देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली.

गेली अनेक वर्षापासून मुंबईत क्रुझ टर्मिनल होण्यासाठी प्रयत्न होत होते. काही कारणामुळे या टर्मिनल होण्यास अडथळ येत होते. पण, या अडथळांवर अंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रुझ टर्मिनल येत्या अडीच वर्षात पुर्ण करण्याचा मानस भाजपा सरकारने मात मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष सजंय भाटिया यांनी सांगितले. तसेच टर्मिनलच्या भुमी पूजनासोबतच मुंबई पोर्ट ट्रास्टच्या वतीने २७ नवीन प्रकल्प देखली जाहीर करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या निर्लज्जपणाचा तीव्र निषेध करतो !

News Desk

मराठी बिग बॉसमध्ये अजून एक वाईल्ड कार्ड एण्ट्री

News Desk

भारतीय संघाचा दारुन पराभव २-०ने मालिका गमावली

swarit