HW Marathi
मनोरंजन

अभिनेत्री सोनाली बेंद्रे मायदेशी परतली

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोमवारी (३ डिसेंबर) पहाटे न्यू-यॉर्कमधून मायदेशी परतली आहे.  न्यू-यॉर्कमध्ये कॅन्सर आजारावर औषधोपचार घेतल्यानंतर सोनाली जवळपास पाच महिन्यांनंतर मुंबईमध्ये दाखल झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हाय ग्रेड कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. यानंतर उपचारांसाठी ती न्यू-यॉर्कमध्ये रवाना झाली होती.

तसेच मुंबईत दाखल झाल्यानंतर सोनालीचे पती गोल्डी बहल यांनी सांगितले की, सोनालीची प्रकृती सुधारत आहे. सध्या तिच्यावरील उपचार थांबवण्यात आले आहेत.  पण हा आजार पुन्हा कधीही बळावू शकतो. त्यामुळे नियमित वैद्यकीय तपासणी सुरूच राहतील.

मायदेशी परतणार असल्याची माहिती खुद्द सोनालीने रविवारी (२ डिसेंबर) ट्विटरवर शेअर केली होती. आपल्या देशात येणे हे किती खास बाब आहे, असे तिने ट्विटरवर पोस्टमध्ये शेअर केले होते. दरम्यान, काही काळ विश्रांती घेऊन सोनाली पुन्हा उपचारांसाठी न्यू-यॉर्कला रवाना होणार आहे.

Related posts

रजनीकांत यांच्या ‘पेटा’ सिनेमाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा

News Desk

अरबाजला हनी ट्रॅपमध्ये अडकविल्याचा पोलिसांना संशय

News Desk

लोकशाहीर गफूरभाई पुणेकर पंचतत्वात विलीन

News Desk