HW News Marathi
मनोरंजन

सोनाली बेंद्रे लवकरच भारतात परतणार

न्यूयॉर्क | कॅन्सरवर उपचार करण्यासाठी न्यूयॉर्कला गेलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच भारतात परतणार आहे. मुंबईत येऊन काही दिवसांसाठी विश्रांती घेऊन ती पुन्हा न्यूयॉर्कला उपचार घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती ट्विटरद्वारे खुद सोनालीने दिली आहे. काही महिन्यांपूर्वी सोनालीला कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर ती लगेच न्यूयॉर्कला उपचारासाठी हलवण्यात आले होते. सोनालीला कर्करोग झाल्याच्या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. पण सगळ्यांना धैर्य बाळगण्याचे आवाहन तिने केले होते.

आपल्यावरील उपचारांचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता आपल्याला भारतात जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. बरेच दिवस घर, मित्र आणि ‘मुंबई’पासून दूर असल्याने तिला या सगळ्यांची प्रचंड आठवण येत होती. तेव्हा मुंबईला येण्याचा आनंद तिने ट्विटरवर ट्विट टाकून व्यक्त केला आहे. ‘कधी कधी आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. पण जशी आपल्या घरापासून आपली अंतरं वाढत जातात तसतसे आपले आपल्या घराशी नातं अधिक घट्ट होत जातात. आपला परिवार आणि मित्रमंडळींना भेटणे ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे’ त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे असेही तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सोनाली बेंद्रेच्या भारतात येण्याची सगळ्याच सिनेसृष्टीला उत्सुक्ता लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाच राज्यात पद्मावत सिनेमा प्रदर्शित होणार नाही

News Desk

चिंताजनक !आतापर्यंतची सर्वाधिक वाढ, देशात एका दिवसात ४५ हजार कोरोना रुग्ण आढळले

News Desk

यंदा तीळ-गुळावर महागाईची संक्रात

News Desk