HW News Marathi
मनोरंजन

नेहरु सेंटरमध्ये निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

मुंबई | सुप्रिद्ध चित्रकार इशाक अली सय्यद यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन वरळीच्या नेहरु सेंटर मध्ये भरविण्यात आले आहे. कलास्पर्श या शीर्षकांतर्गत भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात वेगवेगळ्या निसर्ग चित्रांचा समावेश आहे. चित्रकार इशाक अली हे पेशाने शिक्षक असून विद्यार्थ्यांना कला आत्मसात करण्याविषयी कुतूहल निर्माण व्हावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.

छंदातून जोपासलेल्या या कलेला त्यांनी सध्या व्यवसायीक स्वरुप दिले आहे. सदर प्रदर्शनात त्यांनी निसर्गाचे वैभव व सौदर्य या विषयांवर आधारित मनोवेधक व आकर्षक चित्रे मांडली आहेत. चित्रकार इशाक अली सय्यद यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून निसर्ग सौंदर्याची विविध ऋतूंमध्ये आढळणारी रुपे, त्या सृष्टीसौंदर्याचा रम्य अविष्कार तसेच जीवनातील वास्तव साकारले आहे. चित्रांतील आकर्षक मांडणी व संकल्पना लक्षवेधी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोकळ धमक्या देणारा एक मुलगा

News Desk

सैयामी खेरने सिद्धार्थकडून घेतले ग्रामीण भाषेचे धडे

News Desk

अभिनयातून साकारलेल्या विविधांगी भूमिकांमुळे अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील !

News Desk