HW News Marathi
मनोरंजन

पारशी धर्मियांचे नववर्ष !

गौरी टिळेकर | पतेती हा पारशी धर्मियांच्या वर्षाचा शेवटचा दिवस ! आपल्या देशात पारशी धर्मियांची संख्या अत्यल्प असली तरी सर्वच क्षेत्रांमधील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. एक अलिप्त, शांत आणि निरुपद्रवी समाज म्हणून हा समाज ओळखला जातो. ह्या समाजाने देशाला त्यांच्या कामगिरीने आणखी समृद्ध केले. स्वातंत्र्य लढ्यापासून व्यवसायक्षेत्रांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ह्या समाजाने स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले. इस्राईल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला ‘नवरोज’ म्हटले जाते. ह्या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन त्यांच्या दैवताची प्रार्थना करतात.

पारशी धर्मियांचा देव झोरोस्टार ह्यांचा जन्म दिवस म्हणून खोरदाद हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस नवरोजनंतर सहाव्या दिवशी साजरा केला जातो. ह्या दिवशीदेखील पारशी लोक त्यांचे अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात. गोड पदार्थ आणि शुभेच्छासह हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. ‘चांगले विचार, आचार आणि सतकर्म’ हा या पवित्र दिवसाचा संदेश आहे.

पारशी विवाह

पारशी धर्मियांसाठी विवाह संस्था अतिशय महत्त्वाची आहे. पारशी विवाहासाठी त्यांचा ‘पारशी लग्न आणि फारकतीचा कायदा’ आहे. पारशी विवाहाच्या आधी दोन्ही घरात दिवे लावले जातात. त्यांनंतर दोन्हीकडचे कुटुंबीय एकमेकांना भेटायला जातात तेव्हा चांदीची नाणी शकून म्हणून नेण्याची प्रथा आहे. पारशी विवाहाचा पोशाख पांढरा असून, विधी दरम्यान कूंकू लावणे, अक्षता आणि ओटी भरणे अशा प्रथा आहेत.

पारशी हॉटेल्स

१९व्या शतकाच्या प्रारंभी जेव्हा हे इराणी-पारशी लोक मुंबईत आले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होते. नंतर हळूहळू आपल्या खाद्यसंस्कृतीने त्यांनी ह्या शहराला भुरळ पाडली. मुंबईसह देशातील अनेक शहरांत पारशी हॉटेल्सची लोकप्रियता प्रचंड आहे. मुंबईतील नाक्या- नाक्यांवर इमारतींच्या कोपऱ्याच्या गाळ्यांत ही पारशी हॉटेल्स गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ स्वतःचे एक वेगळेपण जपत आहेत. या पारशी हॉटेल्सना इराणी हॉटेल्स किंवा इराणी कॅफेज असेही म्हणतात. या कॅफेजमध्ये शिरताच ‘आपण थेट १९व्या शतकात आलो आहोत’ असे वाटले नाही तरच नवल! इराणी चहा, ब्रूनमस्का, पुडिंग, वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट्रीज, खिमा पाव, ऑम्लेट पाव, बेरी पुलाव असे कित्येक पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… धनत्रयोदशीचे महत्व !

News Desk

मोरुची मावशीचे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन

swarit

जाणून घ्या… पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कधी येणार

News Desk