HW News Marathi
मनोरंजन

#MeToo : नानांसह चौघांवर ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मुंबई । जेष्ठ अभिनेता नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक (कोरियोग्राफर) गणेश आचार्य यांच्यासह ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माता सामी सिद्धिकी या चौघांवर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने गुन्हा दाखल केला आहे. या चौघांविरोधात जबाब नोंदविण्यासाठी अभिनेत्री तनुश्रीने बुधवारी सायंकाळी ओशिवारा पोलीस ठाण्यात पोहोचली.

तिला कोणी ओळखू नये म्हणून तिने आणि मीडियाला टाळण्यासाठी तनुश्रीने बुरखा परिधान केला होता. वकील अ‍ॅड. नितीन सातपुते आणि त्यांच्या आणखी एका वकील सहकाऱ्यासह तनुश्री पोलीस ठाण्यात पोहचली. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. यात नाना पाटेकर, गणेश आचार्य, राकेश सारंग आणि सामी सिद्धिकी यांच्यावर आरोप केला असल्याची माहिती सूंत्रांकडून मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनी लिओनीचे आणखी एक आयटम सॉग

News Desk

उदयनराजेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

News Desk

‘सेक्रेड गेम्स २’ लाही ‘मीटू’चा फटका ?

News Desk