मुंबई | बहुचर्चित ‘ठाकरे’ सिनेमाचे नुकतेच ट्रेलर लाँच झाले आहे. यानंतर ठाकरे सिनामाचा ट्रेलरची सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. हा सिनेमा येत्या २५ जानेवारी रोजी ‘ठाकरे’ प्रदर्शित होणार आहे. या सिनेमा व्यतिरिक्त कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून धमकी दिली आहे.
ठाकरे चित्रपटाशिवाय इतर कोणताही चित्रपट आम्ही २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होऊ देणार नसल्याची स्पष्ट इशारा लोकरे यांनी दिली आहे. ‘ठाकरे’ चित्रपट हा दिवगंत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर चित्रपट आहे. त्यामुळे बाळासाहेबांवर प्रेम करणारे आणि शिवसैनिकांचीदेखील हिच इच्छा असल्यामुळे आम्ही इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित करू देणार नसल्याचा लोकरे यांनी म्हटले आहे.
‘ठाकरे’ सिनेमाबरोबर २५ जानेवारी रोजी कंगणा रनौतची भूमिका असलेला आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत असलेला ‘मणकर्णिका’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला ‘चीट इंडिया’ चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. तर, ठाकरे चित्रपट हा मराठी आणि हिंदीत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शिवसेना चित्रपट सेनेच्या इशाऱ्यानंतर आता बॉलिवूड चित्रपट माघार घेणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.