HW News Marathi
मनोरंजन

१४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला ‘माऊली’

मुंबई | ‘लय भारी’ सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर या सिनेमातील ‘माऊली’ या व्यक्तिरेखेवर आधारित अभिनेता रितेश देशमुख याचा सिनेमा येतोय. ‘माऊली’ या सिनेमाचा ट्रेलर रितेश देशमुखने ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यात रितेश देशमुख पंढरपुरातील एका प्रामाणिक व डॅशिंग इन्स्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख या पोलिसाच्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. गुंडाराज व अन्याविरुध्द या माऊलीचा संघर्ष यात पाहायला मिळेल. विशेष म्हणजे सिनेसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेता जितेंद्र जोशी यात खलनायकाची भूमिका रंगवतोय. तर अभिनेता सिध्दार्थ जाधव देखील आपल्याला एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

रितेश देशमुखची नायिका म्हणून या बहुचर्चित सिनेमात अभिनेत्री सयामी खेर झळकणार आहे. रितेशचे या सिनेमातले संवाद प्रदर्शनापूर्वीच प्रचंड गाजू लागले आहेत. माऊली हा सिनेमा १४ डिसेंबरला भेटीला येणार असून सर्वांनाच आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.

सलमान खानने सुद्धा माऊलीचा ट्रेलर ट्विट केला आहे. सर्वांचा भाऊ आणि आपला माऊली येतोय. त्याच्या एन्ट्रीवर शिट्टी वाजवा, असे सलमानने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Anant Chaturdashi | विसर्जन मिरवणुकीत महापौरांना धक्काबुक्की

swarit

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

Aprna

जाणून घ्या… मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यामागचे वैज्ञानिक कारण

News Desk