मुंबई : बोल्ड आणि बिंधास्त वागण्यासाठी प्रसिद्ध असलेली पूनम पांडे यावेळेस मात्र चक्क साडीमध्ये दिसली आहे. पूर्ण कपड्यांमधील काही फोटोज तिने अपलोड केल्यामुळे चाहते थक्क झाले आहेत. चाहत्यांना तिचे पूर्ण कपड्यातील फोटो फारसे भावलेले नाहीत. त्यामुळेच तिच्या या संस्कारी लूकची खिल्ली उडविली जात आहे. पूनम गणरायाच्या दर्शनासाठी गेली होती. गणेशाच्या मूर्तीसमोर ती हात जोडून उभी असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.
दरम्यान, पूनमच्या या फोटोवर युजर्सकडून मजेशीर कॉमेण्ट दिल्या जात आहेत. एका युजर्सने लिहिले की, ‘तुला पूर्ण कपड्यांमध्ये बघून आम्हीहैराण आहोत.’ तर एका युजर्सने लिहिले की, ‘संस्कार पूनम हे पचवायला जरा जड जात आहे.’फोटो कॅप्शनमध्ये पूनमने लिहिले की, ‘गणरायाकडून आशीर्वाद मिळाला. गणपती बाप्पा मोरया’. पूनमने अंधेरी येथे गणरायाचे दर्शन घेतले.
पूनम नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर अपलोड करून खळबळ उडवून देत असते. २०११ मध्ये ‘जर भारत मॅच जिंकला, तर मी सर्व कपडे काढणार’ असे वक्तव्य तिने केले होते. भारत मॅच जिंकल्यानंतर पूनमने तिचा एक नेकेड फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. आतापर्यंत तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर २७४ फोटोज् अपलोड केले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.