HW News Marathi
मनोरंजन

प्रियांका -निक ‘रोका’ सेरेमनीचा फोटो व्हायरल

मुंबई | देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या आयुष्यात आजचा दिवस खास आहे. प्रियांकाने आज आपला अमेरिकन बॉयफ्रेंड निक जोनासच्या नात्याला घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबईत प्रियांकाची रोका सेरेमनी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

प्रियांकाच्या कुटुंबाने आज एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले आहे आणि या ग्रॅण्ड पार्टीच्या आधी सकाळी आठ वाजता प्रियांका व निकचा ‘रोका’ करण्यात आला. तर दोघांच्या ‘रोका’चे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते आहेत. यामध्ये प्रियांका यलो कलरच्या लहेंग्यात तर निक व्हाइट कलरच्या शेरवानीत दिसतोय. कपलच्या रोकासाठी परिणीती चोप्रा सर्वप्रथम प्रियांकाच्या घरी पोहोचली.

मुंबईत आयोजित केलेल्या एका ग्रॅण्ड पार्टीतसाठी प्रियांकाचा बॉयफ्रेन्ड निक जोनास आणि त्याचे अख्खे कुटुंब सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झालेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजची पार्टी खास निक आणि प्रियांकाच्या कुटुंबीयांसाठी आयोजित केली गेली आहे. त्यामुळे यात बॉलिवूड सेलिब्रिटी नसतील केवळ कुटुंबाचे सदस्यचं या पार्टीत सामील होतील. बॉलिवूडच्या बड्या-बड्या स्टार्सलाही या पार्टीचे निमंत्रण दिले गेलेले नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ अभिनेता कादर खान यांचे निधन

News Desk

रुद्रम मालिकेतून मुक्ता बर्वे पुन्हा छोट्या पडद्यावर

News Desk

मराठी बिग बॉसच्या अंतिम फेरीची तयारी जल्लोषात सुरु…

News Desk