HW Marathi
मनोरंजन

राहुल गांधींच्या बायोपिकचा टिझर लॉंच

मुंबई | सध्या विविध राजकीय व्यक्तींच्या जीवनावर आधारीत चित्रपटांचा बॉलिवूडमध्ये बोलबाला दिसून येत आहे. नूकताच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारीत ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळाहेब ठाकरे यांच्य़ा जीवनावर आधारीत ठाकरे चित्रपट आला. तर आता कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावर आधारीत ‘माय नेम इज रा गा’ हा चित्रपट येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला आहे.

‘माय नेम इज रा गा’ या सिनेमामध्ये अश्विनी कुमारने राहुल गांधींची भूमिका साकारली आहे. राहुल गांधी यांचे बालपण, त्यांचे अमेरीकेतील शिक्षण, यासोबतच तत्कालीन राजकीय वादविवादांचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. रुपेश पॉल यांनी सिनेमाची पटकथा लिहीली आहे. रुपेश पॉल मूळचे पत्रकार आहे.

‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटाप्रमाणे याही चित्रपटात पतंप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राजीव गांधी यासरख्या राजकीय व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्या हत्येच्या दृष्यापासून या चित्रपटाची सुरुवात होते तर येणाऱ्या निवडणुकांच्या वातावरणात या सिनेमाचा शेवट करण्यात आल्याच टीझर वरून लक्षात येत आहे. लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापलेलेल असतांना हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

 

Related posts

टॉयलेट’ने दोन दिवसांत कमावले ३० कोटी

News Desk

स्मिता पाटील बातमीदार ते संवेदनशील अभिनेत्री एक प्रवास

News Desk

‘मणिकर्णिका’ सिनेमाला ब्राम्हण सभेचा विरोध

News Desk