HW News Marathi
मनोरंजन

रजनीकांत यांच्या ‘पेटा’ सिनेमाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा

मुंबई | साऊथचा सुपरस्टार आणि थलायवा रजनीकांत यांच्या २.० नंतर ‘पेटा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. कार्तिक सुभाराजच्या दिग्दर्शन खाली हा सिनेमा तयार झाला आहे. ‘पेटा’चा सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. रजनीकांत यांच्याशिवाय यात विजय सेथुपत्ती, त्रिशा, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बॉबी सिम्हा यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात रजनीकांत एक गँगस्टारच्या भूमिकेत दिसणार आहेत. पेटा तुम्हाला १९८० ते ९० च्या दशकाची आठवण करुन देणार आहे. ट्रेलरमध्ये सगळीकडे रजनीकांत दिसत आहेत.

अ‍ॅक्शन आणि लव्हस्टोरी असा कॉम्बो या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरूनच दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. तेव्हापासून रजनीकांत यांचे फॅन्स मोठ्या आतुरतेने ट्रेलरची वाट पाहत होते. आता ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. ‘पेटा’चा दिग्दर्शक कार्तिक आणि अभिनेता विजयसोबत हा रजनीकांत यांचा दुसरा सिनेमा आहे.

याआधी रजनीकांत यांनी दोघांसोबत ‘पिज्जा’मध्ये एकत्र काम केले आहे. नवाजुद्दीन या सिनेमातून तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. नवाज यात व्हिलनची भूमिका साकारताना दिसत आहे. या सिनेमाला घेऊन नवाज खूपच उत्सुक आहे. या सिनेमाचे शूटिंग उत्तराखंडमध्ये झाले आहे. अभिनेत्री सिमरन बग्गासोबत रजनीकांत यांची रोमाँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगमन बाप्पाचे | ‘श्री’रंगी रंगल्या बाजारपेठा

swarit

मोबाईलवर चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटांनाही मिळणार अनुदान

News Desk

अभिनेता मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

News Desk