HW News Marathi
राजकारण

शिवसेनेकडून फोन आल्यानंतर मी मतदान केले !

मुंबई | अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्या मतावरून वाद निर्माण झाला आहे. हा इतका विकोपाला गेला की, छिंदमचे हे मत नाकारत शिवसैनिकांनी छिंदमला सभागृहात मारहाण करून सभात्याग केला. यानंतर शिवसेनेचे उमेदवार बोराटे यांनी विनंती केल्यानुसारच आपण मतदान केल्याचा दावा छिंदमने केला आहे. यामुळे अहमदनगरमधील राजकारण चांगलेच तापले आहे.

शिवसेनेकडून फोन आल्यानंतर मी मतदान केल्याचा दावा करत श्रीपाद छिंदमने माध्यमांसमोर एक ऑडिओ क्लीप सादर केली. तर ही क्लीप बनावट असल्याचे बोराटे म्हणाले आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच भाजप आणि राष्ट्रवादीने छिंदमला शिवसेनेला मत देण्यास सांगितल्याचा आरोप शिवसेनेकडून केला आहे. तसेच छिंदम याला सभागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश पीठासन अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गेट वेल सून माय फ्रेंड बीजेपी” | संजय राऊत

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचे काम शशांक राव यांनी केले !

News Desk

तुम्हाला तिथे बसायची संधी मिळाली, म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो !

News Desk