HW News Marathi
मनोरंजन

३० व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल घोषित

मुंबई : ३० व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेच्या संगीत देवबाभळी या नाटकासाठी रु. ७लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. सुधीर भट थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या अनन्या या नाटकाला ४ लाख ५० हजाराचे व्दितीय पारितोषिक आणि त्रिकुट, मुंबई या संस्थेच्या वेलकम जिंदगी या नाटकाला ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

९ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्याम भूतकर, वामन तावडे, डॉ. अनिल बांदिवडेकर, जयंत पवार आणि शकुंतला नरे यांनी काम पाहिले होते. या स्पर्धेतील सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

दिग्दर्शनासाठी पारितोषिक

प्रथम – प्रताप फड (नाटक-अनन्या) – रु.१,५०,०००/-

व्दितीय – प्राजक्त देशमुख (नाटक-संगीत देवबाभळी)- रु. १,००,०००/-

तृतीय – स्वप्नील बारस्कर (नाटक-अशीही श्यामची आई) – रु.५०,०००/-

नाट्यलेखन पारितोषिक

प्रथम- प्राजक्त देशमुख (नाटक-संगीत देवबाभळी)- रु.१,००,०००/-

व्दितीय- अजित दळवी (नाटक-समाजस्वास्थ)- रु.६०,०००/-

तृतीय – चैतन्य सरदेशपांडे (नाटक-माकड) – रु.४०,०००/-

प्रकाश योजना पारितोषिक

प्रथम – प्रफुल्ल दिक्षित (नाटक-संगीत देवबाभळी)- रु.४०,०००/-

व्दितीय- भूषण देसाई (नाटक-अनन्या) – रु.३०,०००/-

तृतीय- राजन ताम्हाणे (नाटक-वेलकम जिंदगी)-रु.२०,०००/-

नेपथ्य पारितोषिक

प्रथम – संदेश बेंद्रे (नाटक-अनन्या)- रु.४०,०००/-

व्दितीय- प्रदिप मुळे (नाटक-संगीत देवबाभळी)- रु.३०,०००/-

तृतीय- प्रसाद वालावलकर (नाटक-अशीही श्यामची आई)- रु.२०,०००/-

संगीत दिग्दर्शन पारितोषिक

प्रथम – आनंद ओक (नाटक-संगीत देवबाभळी) – रु.४०,०००/-

व्दितीय- समीर साप्तीकर (नाटक-अनन्या)- रु.३०,०००/-

तृतीय- अभिजित पेंढारकर (नाटक-अशीही श्यामची आई)-रु.२०,०००/-

वेशभूषा पारितोषिक

प्रथम- महेश शेरला (नाटक-संगीत देवबाभळी)- रु.४०,०००/-

व्दितीय- माधुरी पुरंदरे (नाटक-समाजस्वास्थ)- रु.३०,०००/-

तृतीय- चैताली डोंगरे (नाटक-वेलकम जिंदगी)- रु.२०,०००/-

रंगभूषा पारितोषिक

प्रथम- सचिन वारीक (नाटक-संगीत देवबाभळी) -रु.४०,०००/-

व्दितीय – शरद सावंत व सागर सावंत (नाटक-वेलकम जिंदगी)- रु.३०,०००/-

तृतीय- संदीप नगरकर (नाटक-अशीही श्यामची आई)- रु.२०,०००/-

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.५०,०००/-

पुरुष कलाकार : राहुल शिरसाट (नाटक-माकड), सिध्दार्थ बोडके (नाटक-अनन्या), अतुल पेठे (नाटक-समाजस्वास्थ), मकरंद अनासपुरे (नाटक-उलट सुलट), भरत जाधव (नाटक-वेलकम जिंदगी)

स्त्री कलाकार : सोनाली मगर (नाटक-माकड), शुभांगी सदावर्ते (नाटक-संगीत देवबाभळी), अतिशा नाईक (नाटक-अशीही श्यामची आई), ऋतुजा बागवे (नाटक-अनन्या), शिवानी रांगोळे (नाटक-वेलकम जिंदगी)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#मीटू : पेंटर जतिन दास यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप

Gauri Tilekar

जाणून घ्या… दिवाळीच्या फराळमधील ‘अनारसे’ सोप्या पद्धतीने कसे कराल  

swarit

सण नारळी पौर्णिमेचा

News Desk