HW News Marathi
मनोरंजन

रिंकू राजगुरू ‘कांगर’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

मुंबई । राष्ट्रीय पुरस्कार विजेती सैराट सिनेमातील अभिनेत्री रिंकू राजगुरू आता कोणत्या नवीन चित्रपटासह आपल्या भेटीला येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. कारण आकाश ठोसर सैराट नंतर पाड्यावर पुन्हा झळकला पण रिंकू मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. त्यामुळे रिंकू राजगुरूच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. सर्वांची लाडकी आर्ची लवकरच नवीन चित्रपटासह वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कांगरच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली असून उदाहरणार्थ निर्मिती संस्थेच्या सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. परंतु या चित्रपटात रिंकूची जोडी कोणासोबत रंगणार आहे. हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून या चित्रपटासाठी रिंकू प्रचंड मेहनत घेत आहे. याचाच प्रत्यय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू काही दिलखेचक अदा करताना दिसत आहे. दरम्यान, कांगरच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर पेजवर गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात रिंकू एका उडत्या चालीच्या गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. हा डान्स करताना रिंकू भलतीच खुशीत आहे आणि ती नाचताना धमालही करत आहे.

तसेच ‘लवकरच येतोय कांगर’ असं सांगायलाही ती विसरत नाही. या गाण्याच्या चालीवरून चित्रपट कसा असेल याचा एक अंदाजही बांधता येईल. मात्र, रिंकूच्या या दिलखेच अदा प्रेक्षकांना नक्कीच भुलवतील यात काहीच शंका नाही. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाॅलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

News Desk

राहुल गांधींच्या बायोपिकचा टिझर लॉंच

News Desk

टॉयलेट’ने दोन दिवसांत कमावले ३० कोटी

News Desk