मुंबई | दिग्दर्शक संजय जाधव यांनी सोशल मीडियावर आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ते लवकरच ‘लकी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ या दोन संस्था या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर संजय जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 7 फेब्रुवारी 2019 ला ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला ‘लकी’ चित्रपट रिलीज होणार आहे. एमएस धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या हिट चित्रपटाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग ‘लकी’ चित्रपटाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे.
संजय जाधवच्या ‘लकी’ चित्रपटातून दक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवलेली अभिनेत्री दिप्ती सती पदार्पण करत आहे. या चित्रपटामध्ये अभय महाजन आणि दिप्ती सती मुख्य भूमिकेत दिसतील. चित्रपटाबाबत संजय जाधव म्हणतो, व्हॅलेंटाईन्सच्या महिन्यात रिलीज होणारा आमचा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट तरूणाईला खूप आवडेल, असा आमचा विश्वास आहे. तुम्ही हा चित्रपट तुमच्या संपूर्ण कुटूंबासोबत पाहू शकाल आणि तुमचे दोन तास भरपूर मनोरंजन होईल, ह्याची मला शाश्वती आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.