HW News Marathi
मनोरंजन

श्रेयस चे विठ्ठला विठ्ठला  

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि स्फूर्तिस्थान असलेल्या श्री विठ्ठलावर आधारित ‘विठ्ठल ‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ह्या चित्रपतील विठ्ठला विठ्ठला हे गाणे रिलीज झाले आहे.भरपूर दिवसांनी मराठी मध्ये दिसणारा श्रेयस तळपदे हा २५ फूट अशा भव्य विठ्ठलाच्या मूर्ती समोर वंदन करताना दिसत आहे. २५० डान्सर सोबत ढोल ताशा पथक, अबीराची उधळण, भगव्या पताका, गाण्याच्या शेवटी सचित पाटील च्या रूपात होणारे विठ्ठल दर्शन आणि विशाल दादलानीचा दमदार आवाज यासर्वातूनच या गाण्याची भव्यता बघायला मिळत आहे. सदर गाणे गुरु ठाकूर यांनी लिहिले असून राजू सरदार यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

राजीव एस रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन सोबत टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात सचित पाटील, अशोक समर्थ, दीप्ती धोत्रे, भाग्यश्री मोटे आणि हर्षदा विजय हा नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे. ‘विठ्ठल’ नामाचा गजर करणाऱ्या या सिनेमाच्या निर्मीतीची धुरा दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राज पुरोहित यांनी सांभाळली असून, जगदीश जाखड, प्रह्लाद सिंह राजपुरोहित आणि अरुण त्यागी हे सहनिर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ‘विठ्ठल’ या सिनेमाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप दंडवते यांनी संवादलेखन केले आहे. हा चित्रपट ७ डिसेंबर ला जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

श्रींचा बाप्पा यंदा भगव्या महालात

News Desk

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना ट्विटरद्वारे विविध क्षेत्रातील दिग्गजांची श्रद्धांजली

News Desk

या मकरसंक्रांतीला अशी बनवा खमंग तिळगूळ पोळी

News Desk
राजकारण

सरकार शब्दांचा खेळ खेळू पाहत आहे !

News Desk

मुंबई | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांतील सर्वच नेत्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. अजित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सरकार शब्दांचा खेळ खेळू पाहत आहे. मात्र, आम्ही सरकारचा हा बुरखा फाडण्याचा प्रयत्न करणार असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देखील अजित पवार यांनी केला आहे. विरोधकांच्या म्हणण्याचा विचार करून सरकारने अंतिम निर्णय घ्यायचा असतो. परंतु हे सरकार विरोधकांचं म्हणणंच ऐकून घेत नाही. सरकारच्या या भूमिकेमुळे समाजाला न्याय मिळू शकेल का ? याबद्दल आम्हाला शंका असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची हजेरी; तर मुंडे बहिणींची दांडी

Aprna

मराठा आरक्षणावरून विरोधकांचे राजकारण | मुख्यमंत्री

News Desk

#LokSabhaElections2019 : पोटी जन्म घेतला म्हणजे राजकीय प्रश्न कळतीलच असे नाही !

News Desk